शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२१ शाळा, १४ अंगणवाड्यांचा वाली कोण? शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:08 IST

भौतिक सुविधांचा अभाव : कुणीच दखल घेईना

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर सालेकसा व आमगाव-खुर्द परिसरातील एकूण सात प्राथमिक शाळा आणि १४ अंगणवाड्यांना जि.प. तर्फे भौतिक सोयी सुविधांसाठी आवश्यक साहित्य व अनुदान मिळणे बंद झाले. ग्रामपंचायतकडून मिळणारी मदत बंद झाल्याने व नगरपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा कोणतेही अनुदान मिळत नसल्याने प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे २१ शाळा आणि १४ अंगणवाड्यांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सालेकसा नगरपंचायतच्या हद्दीत शहरासह ग्रामीण भागाचा सुद्धा समावेश आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नगरपंचायतच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. या भागात शाळा, अंगणवाडी असल्या तरी त्याकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही. नगरपंचायत क्षेत्रात १४ अंगणवाड्या आणि सात जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. या शाळांना विकासकामांसाठी किंवा रंगरंगोटी व इतर सोयी सुविधांसाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमार्फत पुरविल्या जातात. पण नगरपंचायत क्षेत्रात येत असल्याने या शाळांना या सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. यासंदर्भात जि.प. व पं.स. कडे विचारणा केली तर नगरपंचायत क्षेत्रात येत असल्याचे सांगून मोकळे होतो. नगरपंचायत प्रशासनाकडे पाठपुरावा केला तर या शाळा, अंगणवाड्या जि.प.ने आमच्या सुपूर्द केल्या नसल्याने काहीच करता येत नसल्याचे सांगतात. या वादात विद्यार्थ्यांना मात्र शैक्षणिक सोयी सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष

  • नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांकडून विविध कर आकारणी केली जाते. यात शिक्षण कर सुद्धा घेतले जाते. मात्र शिक्षणासाठी सोयी सुविधा पुरविल्या जात नाही.
  • मग शिक्षण कर कसला, असा २ सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच नगरपंचायत क्षेत्रातील १४ अंगणवाड्या आणि ७ जि.प. शाळांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या शाळांचा आहे समावेशनगरपंचायतीमध्ये ज्या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे, त्यात मराठी वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आमगाव खुर्द, हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा सालेकसा, वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला, वरिष्ठ प्राथमिक शाळा जांभळी, वरिष्ठ प्राथमिक शाळा बाकलसर्रा, प्राथमिक शाळा मुरुमटोला, प्राथमिक शाळा सालेकसा (जुना) या सर्व सात शाळांचा समावेश आहे. तसेच १४ अंगणवाड्यांचा समावेश आहे.

"ग्रामपंचायत असताना सरपंच सचिवांच्या माध्यमातून शाळेला अनेक भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. पण नगरपंचायत झाल्यापासून कुठल्याच सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. नगरपंचायतचे अधिकारी शाळा अद्याप हस्तांतरित झाल्या नसल्याचे सांगतात."- वाय.डी. अंबादे, मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा हलबीटोला,

"शाळा नगरपंचायतमध्ये असल्या तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शालेय पोषण आहार, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या, पाठ्यपुस्तके आणि सुविधा दिल्या जातात."- प्रदीप शरणागत, गटसमन्वयक गटसाधन केंद्र सालेकसा.

टॅग्स :gondiya-acगोंदिया