शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

लाच प्रकरणातील आरोपींवर निलंबनाची कारवाई केव्हा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:45 IST

अडीच महिन्यांपासून कारवाई थंडबस्त्यात : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाठविला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक अर्जुनी नगरपंचायतचे अध्यक्ष, प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार, सभापती, नगरसेवक, नगरसेविकेचा पती, एक व्यापारी अशा सहा जणांना १४ मे २०२४ रोजी १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेताना अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला. १५ मे रोजी सर्व आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले. दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना भंडारा कारागृहात पाठविण्यात आले. येथे मुक्कामानंतर त्यांना ३० मे रोजी बेल मिळाली. नगराध्यक्ष, सभापती व नगरसेवक यांना निलंबन करण्याचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविला. मात्र, अडीच महिने लोटूनही या प्रस्तावावर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

तक्रारदारास नगरपंचायत सडक अर्जुनी दोन नाली बांधकामाच्या ई निविदा मंजूर झाल्या. कार्यारंभ आदेशाची मागणी केली असता, तक्रारदारास नगराध्यक्ष, नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी यांनी निविदा रकमेच्या १५ टक्के लाच मागितली. तक्रारादारास लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार पडताळणी करून १४ मे रोजी सापळा कारवाईदरम्यान नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, एक सभापती, नगरसेवक, नगरसेविकेचा पती यांनी निविदा रक्कमेवर १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८२ हजार रुपये लाच मागितली. दरम्यान आरोपींना लाच स्विकारताना पकडून डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना प्रथम दोन दिवसांची पोलिस कोठडी व नंतर ३० मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आरोपींना बेल मिळाल्यानंतर आरोपी प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारेला त्वरित निलंबित करण्यात आले. पण, अन्य पाच आरोपींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (१) मधील तरतुदींनुसार कोणताही पालिका सदस्य त्याचे कर्तव्य बजावित असताना गैरवर्तन केल्यास किंवा लज्जास्पद वर्तन केल्याबद्दल दोषी ठरला, तर राज्य शासनाला स्वतः हून किंवा नगरपालिकेच्या शिफारशीवरून त्यास पदावरून दूर करण्याची तरतूद आहे. कायद्यातील तरतुदींनुसार तिन्ही आरोपींना निलंबित करण्याचा प्रस्ताव स्थानिक लाचलुपत प्रतिबंधक विभागाने २२ मे रोजी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविला. मात्र, अद्यापही या प्रस्तावावर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सर्व सहाही आरोपींना बेल मिळाली आहे. शासनाने आरोपी शरद हलमारेला निलंबित केले आहे. इतर तीन जणांच्या निलंबनाचा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. कारवाई प्रक्रियेत आहे.- अतुल तवाडे, पोलिस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणgondiya-acगोंदिया