सरपंच, ग्रामविकास अधिकारी, अंभियंत्यांवर कारवाई केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:46+5:302021-07-30T04:30:46+5:30

परसवाडा : गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या दवनीवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी प्रभारी तत्कालीन प्रमोद बिसेन व कनिष्ठ अभियंता ...

When will action be taken against Sarpanch, Village Development Officer, Engineers? | सरपंच, ग्रामविकास अधिकारी, अंभियंत्यांवर कारवाई केव्हा ?

सरपंच, ग्रामविकास अधिकारी, अंभियंत्यांवर कारवाई केव्हा ?

Next

परसवाडा : गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या दवनीवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी प्रभारी तत्कालीन प्रमोद बिसेन व कनिष्ठ अभियंता यांनी जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षाभिंत व इमारत बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. हे बांधकाम करण्याचे कंत्राटसुध्दा आपल्या जवळच्या माणसाला दिल्याची बाब चौकशीत पुढे आली.

दवनीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णा चौधरी व इतर नागरिकांनी या बांधकाम प्रकरणातील गैरव्यवहाराची तक्रार केली होती. याची दखल आता विधान परिषद सदस्य, माजी राज्य मंत्री परिणय फुके यांनी घेतली आहे. यासंबंधी कारवाई करण्याचे पत्र विभागीय आयुक्त, नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गोंदिया यांना दिले आहे. आतापर्यंत याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली. यासंदर्भातील संपूर्ण अहवाल मागविला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरापासून हे प्रकरण सुरू असून, चौकशीत दोषी आढळल्यानंतरही सरपंच, ग्रामविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अर्जदार अण्णा चौधरी व इतर तक्रारदार यांना पत्र देऊन व गैरअर्जदार यांना बोलावून प्रकरणाशी सर्व बाबी अहवालात सादर केला. यात आरोप सिध्दसुध्दा झाले होते. चौकशी अहवालावरून सरपंच, सचिव व अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, यानंतरही जिल्हा परिषदेकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अण्णा चौधरी यांनी याप्रकरणाची तक्रार फुके यांच्याकडे केली. तक्रारीची दखल घेत फुके यांनी विभागीय आयुक्त, नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंदर्भात योग्य कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. यानंतरही कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा अण्णा चौधरी यांनी दिला आहे.

Web Title: When will action be taken against Sarpanch, Village Development Officer, Engineers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.