शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

गोंदिया जिल्ह्यात विधानसभा रिंगणातील ६४ उमेदवारांचे शिक्षण काय? चंद्रिकापुरेच सर्वाधिक उच्चशिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:02 IST

उच्चशिक्षितांविरोधात काही अल्पशिक्षितांचा लढा : विधानसभेच्या रिंगणात आजमावित आहेत भाग्य

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राजकारणासाठी शिक्षणाची अट नाही परिणामी अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत कित्येकच पुढारी राजकारणातील उच्च पदावर पोहचले आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार आता मतदारांनी आपला प्रतिनिधी शिक्षित असावा, अशी आशा आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ६४ उमेदवार उतरले आहेत. यामध्ये उच्चशिक्षितांच्या विरोधात अल्पशिक्षितांचा लढा दिसून येत आहे. मात्र, रशिया रिटर्न डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हे सर्वाधिक उच्चशिक्षित दिसून येत आहेत.

येत्या २० तारखेला विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. या लढ्यात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत एकूण ६४ उमेदवार दंड थोपटून उतरले आहेत. यामध्ये आजी-माजी आमदार आपले भाग्य आजमावित असतानाच काही नवे चेहरे सुद्धा त्यांना लढा देत आहेत. या उमेदवारांमध्ये काही अल्पशिक्षित असून, काही उच्चशिक्षित आहेत. विशेष काही फक्त दोघांनीच विदेशातून शिक्षण घेतल्याचेही दिसत आहे. असे असतानाच रशिया येथून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले अर्जुनी- मोरगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे मात्र सर्वाधिक उच्च शिक्षित दिसत आहेत.

कला शाखेतील १७ उमेदवारउमेदवारांनी अभ्यासक्रमानुसार घेतलेल्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यास यामध्ये कला शाखेतील १७ उमेदवार दिसून येतात. यामध्ये काही पदवीधर, तर काही पदव्युत्तर सुद्धा आहेत. विशेष म्हणजे, १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या उमेद- वारांना सामान्य वर्गात टाकले असता त्यांची संख्या सर्वाधिक २९ दिसून आली.

डॉक्टर व अभियंताही मैदानात निवडणुकीच्या रणांगणात जेथे ६४ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. तेथेच डॉक्टर व अभियंताही आपले भाग्य आजमावताना दिसत आहेत. यामध्ये डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या अन्य उमेदवारांचा समावेश असतानाच अभियंता गटात रत्नदीप दहिवले यांच्यासह अन्य काही उमेदवारांचा समावेश आहे.

विषयनिहाय शिक्षण विज्ञान - ०७कला - १७वाणिज्य - ०२वैद्यकीय - ०२अभियंता - ०४समाजकार्य - ०३सामान्य - २९

उमेदवारांचे शिक्षण आठवी - ०१दहावी - ०७बारावी - १९पदवी - १८पदव्युत्तर - १९ 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदिया