शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोटात केसांचा गोळा बनवणारा मानसिक आजार; ट्राइकोफेगिया कशाने होतो ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:50 IST

Gondia : मानसिक आरोग्य स्थितीमुळे जडतो धोकादायक विकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ट्राइकोफेगिया ज्याला 'केस खाण्याचा आणि ओढण्याचा विकार' देखील म्हणतात, ही एक मानसिक आरोग्यस्थिती आहे. यामध्ये तुमच्या टाळू, भुवया किंवा शरीराच्या इतर भागांवरून केस उपटण्याची आणि खाण्याची वारंवार अदम्य इच्छा असते. तुम्ही या इच्छांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू शकता; परंतु तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. ही एक धोकादायक स्थिती असू शकते.

दुर्मीळ आजार; ताणतणाव, आघाताचा परिणामट्राइकोफेगिया हा दुर्मीळ आजार आहे. यात रुग्ण आपले केस ओढून खात असतो. हा आजार ताणतणाव अधिक असेल तर होत असतो. तसेच मनावर एखादा आघात झाला असेल तर या आजाराला आमंत्रण दिले जाते.

ट्राइकोफेगिया ही मानसिक स्थितीट्राइकोफेगिया ही एक मानसिक स्थिती आहे. यामध्ये व्यक्ती आपले केस ओढून ते खात असते. यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरशी संबंधित वर्तनही आढळतेऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये, व्यक्तीला वारंवार अवांच्छित विचार आणि भावना (वेड) आणि त्यातून निर्माण होणारे सक्तीचे वर्तन आढळते. हे विचार आणि सक्ती व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणतात आणि त्यांना त्रास देतात. ट्राइकोफेगियामध्येही ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरशी संबंधित वर्तन दिसते.

रुग्णास मळमळ, पोटदुखी, उलट्याकेस तोडून खाल्ल्यानंतर पोटात केसांचा गोळा निर्माण होऊ शकतो. यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. याशिवाय मळमळ होणे, पोटदुखी, उलट्याही होऊ लागतात.

पोटात होतो केसांचा गोळाट्राइकोफेगिया हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्ती आपले केस तोडून खात असते. गिळलेले केस पोटात जमा होऊ शकतात आणि ट्रायकोबेझोअर नावाचा एक मोठा केसांचा गोळा तयार करू शकतात.

"ट्राइकोफेगिया -ट्रायकोटेलोफिगा हा आजार मानसिक आहे. व्यक्तीला जास्त तणाव, आघात झाला असेल तर हा आजार जडतो. वेळीच यावर उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा व्यक्तीच्या जिवावर बेतते. औषधे, थेरपीने या आजारावर नियंत्रण आणले जाऊ शकते."- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीgondiya-acगोंदिया