शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता लग्नाचे वऱ्हाड रेल्वेने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

लग्नाची वरात नेण्यासाठी वधू वराच्या पालकांकडून एसटी बुक केली जात होती. पण त्यांना सुध्दा आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वेने पूर्ण गाडी अथवा काही डब्बे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी तुम्हाला रेल्वेचा डब्बा बुक करायचा असल्यास तो आता करणे अगदी सोपे झाले आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मागील दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामुळे प्रवाशांना सुध्दा याचा फटका बसत आहे. तर लग्नाची वरात नेण्यासाठी वधू वराच्या पालकांकडून एसटी बुक केली जात होती. पण त्यांना सुध्दा आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वेने पूर्ण गाडी अथवा काही डब्बे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी तुम्हाला रेल्वेचा डब्बा बुक करायचा असल्यास तो आता करणे अगदी सोपे झाले आहे.

एका डब्यासाठी ७० ते ८० हजार रुपये- रेल्वेचा एक डब्बा बूक करण्याचे दर हे अंतरावरुन ठरतात साधारणपणे गोंदिया ते पुणे या अंतरासाठी रेल्वेचा एक डबा बुक करतो म्हटल्यास त्यासाठी जवळपास ७० ते ८० हजार रुपये लागतात. पण हे दर प्रामुख्याने अंतरावरुन ठरतात.

एका रेल्वे स्थानकावर ७ मिनिटे थांबणार-  रे्ल्वेचा डब्बा अथवा संपूर्ण रेल्वे बुक केल्यास ही गाडी एका रेल्वे स्थानकावर ७ मिनिटांच्या वर थांबणार असे नियोजन रेल्वे विभागाकडून कडून केले जाते. तर संपूर्ण रेल्वे बूक केल्यास ती गाडी केवळ काही विशिष्ट स्थानकावरच थांबविली जाते. अथवा ती तिच्या नियोजित ठिकाणीच थांबते.

५२ हजार ५०० रुपये एका डब्यासाठी- रेल्वेचा संपूर्ण एक डबा बुक करण्यासाठी ५२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम म्हणून आधी जमा करावी लागते. नंतर काही दिवसांनी ही रक्कम परत केली जाते. केवळ सुरक्षा ठेव म्हणून ही रक्कम घेतली जाते.

लाखात करा संपूर्ण रेल्वे गाडी बुक- लग्न कार्य अथवा इतर कुठल्या कार्यक्रमासाठी रेल्वे गाडी बूक करता येते. यासाठीचे दर अंतरावरुन निश्चित केले जातात. गोंदिया ते पुणे या अंतरासाठी संपूर्ण रेल्वे गाडी बुक करण्यासाठी जवळपास २० लाख रुपयांचा खर्च येतो. जेवढे अंतर कमी तेवढे दर कमी होतात.

रेल्वेने वऱ्हाड, असे करा बुक

- रेल्वेचा डब्बा अथवा संपूर्ण गाडी बुक करायची असल्यास रेल्वे स्थानकावरील बुकींग ऑफीस अथवा आयआरसीटीसीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर जावे. यासाठी रेल्वेने काही रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे अनिवार्य केले आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेmarriageलग्न