शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आणखी आठवडाभर करावी लागणार पाण्यासाठी प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 15:55 IST

ढिसाळ नियोजनामुळे वारंवार खंड : एक कोटी रुपयांची पाणीपट्टीही थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बनगाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या नलिकेत बाम्हणी रेल्वे चौकीजवळ गळती झाली आहे. या गळतीमुळे १५ ऑक्टोबरपासूनच पाणी पुरवठा बंद आहे. या कामाला आणखी आठवडा लागणार असल्याची माहिती संबंधीत विभागाने दिली आहे. यामुळे आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ३६ गावांना आणखी आठवडाभर पाणी मिळणार नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या गावांवर पाणीपट्टीचे एक कोटी रुपये थकीत आहेत. १७ ऑक्टोबर रोजी आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तब्बल २३ लाख रुपये जमा केले आहे. मोदी सरकार एकीकडे 'घर घर नल, हर घर जल' असे म्हणत आहे. परंतु भाजपची सत्ता असलेली जिल्हा परिषद या योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता नागरिक त्रस्त झाले आहेत. 

कधी वीज पुरवठा खंडित, कधी पाईपलाईनला गळती, कधी देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीला पैसे दिले नाही, अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापिटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाहीत. परिणामी ३६ गावांवर एक कोटी रुपये थकीत आहेत. 

योजना बंद झाल्याचीच माहिती अधिकारी देतात योजनेचे थकीत बिल भरण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी या योजनेचे पाणी वापरणाऱ्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना बनगाव पाणी पुरवठा या व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोडून त्यांच्यात सतत जनजागृती करणे अपेक्षित आहे. परंतु योजनेच्या बिलाची थकीत आकडेवारी पुढे येत नाही. योजनेचा विद्युत पुरवठा बंद झाला की माहिती देण्यात येते. ही योजना चालविणारे अधिकारी उदासीन आहेत.

आठवडाभरापासून पाणी मिळेना, नागरिक पडले आजारी या योजनेतून मिळणारे पाणी शुद्ध होते. परंतु ते पाणी मिळणे बंद झाल्याने आता नागरिक गरजेसाठी दूरवरून विहीर, बोअरवेल, डबके येथील पाणी वापरत आहेत. त्यामुळे आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील लोकांना विविध आजार जडले आहे. याकडे जि.प.ने जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

वेळेवर बिलच देत नसल्याने होत नाही वसुली पाणी पुरवठ्याचे बिल वेळेवर नगर परिषद व ग्रामपंचायतींना देत नसल्यामुळे थकीत पैसे ग्रामपं- चायत भरत नाही. नगर परिषदेला बिलच पोहचत नसल्यामुळे पैसे किती आणि केव्हा भरायचे, हे कर्मचाऱ्यांना समजत नाही. त्यामुळे ही योजना राबविणाऱ्या योजनेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया