शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

कालव्याच्या दुरूस्तीशिवाय पाणी आणण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:25 PM

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला धरणाचे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्या कालव्याव्दारे पाणी आणण्याचे नियोजन केले जात आहे,त्याची अद्यापही दुरूस्ती झाली नसल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआज अधिकारी देणार भेट : शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला धरणाचे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्या कालव्याव्दारे पाणी आणण्याचे नियोजन केले जात आहे,त्याची अद्यापही दुरूस्ती झाली नसल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शहरवासीयांना प्रती व्यक्ती १८६ लिटर याप्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन चार वर्षांपासून शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वैनगंगा नदीच्या पात्रात सिमेंटच्या चुंगड्याचा बंधारा तयार करुन विहिरीची पाणी पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तर मागील वर्षी पाणी टंचाईची समस्या गंभीर झाल्याने यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्यात आले होते. यंदा देखील तीच वेळ आली असून वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरडे पडल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पातळी खालावली आहे. त्यामुळेच शहरवासीयांना ७ दिवस नियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून त्यानंतर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे.यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सिंचन विभाग आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा पुजारीटोला धरणातून पाणी आणण्यासाठी उपाय योजना करण्याच्या कामाला लागली आहे.मात्र ज्या कालव्याव्दारे पाणी आणण्यात येणार आहे. त्याची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही.त्यामुळे त्यामुळे पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचणार की नाही यावर शंका उपस्थित केली जात आहे.मागील वर्षी फुटला होता कालवापुजारीटोला धरणातून डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपंर्यत पाणी पोहचविण्यासाठी सिंचन विभागाच्या कालव्याचा वापर मागील वर्षी करण्यात आला होता. यंदा देखील तोच प्रयोग राबविण्यात येणार आहे. मात्र मागील वर्षी कामठा आणि आमगावजवळ पाणी सोडल्यानंतर कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला होता. तर यंदा सुध्दा या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नसून पाणी सोडण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे पुन्हा समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धरण आणि कालव्याची पाहणी आजशहरावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी पुजारीटोला धरणातून पाणी आणणण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि सिंचन विभागाचे अधिकारी सोमवारी (दि.१५) पुजारीटोला प्रकल्प आणि कालव्याची पाहणी करणार आहेत.कोट्यवधी रुपयांच्या योजनेनंतरही समस्याशहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी चार वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये खर्चून डांगोर्ली येथे पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली होती. मात्र सुरूवातीचे वर्ष वगळता मागील तीन वर्षांपासून शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची योजना केवळ नाममात्र ठरत आहे.