शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:54 IST

चार दिवस कामाला सुरुवातच नाही : पाणी पुरवठा विभाग उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांतील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या गावांचा पाणी पुरवठा पाइपलाइन लिकेज झाल्याने १७ जानेवारीपासून ठप्प आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बनगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनला बोरकन्हार येथे गळती लागल्याने पाइप दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. मंगळवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. कधी वीजपुरवठा खंडित, कधी पाइपलाइनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही अशा विविध कारणांमुळे बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापिटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाही. 

३६५ पैकी ६५ दिवस योजना बंद बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नळकनेक्शनधारकांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. कधी वीज पुरवठा खंडित, तर कधी पाइपलाइनला गळती यामुळे ही योजना बंद असते. ३६५ पैकी ६५ दिवस ही योजना बंद राहत असल्याची कबुली विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आज सायंकाळपर्यंत सुरू होणार पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद झाला की याची माहिती दिली जाते. थकीत वीज बिलाचे नियोजन आधीच होणे अपेक्षित आहे. १७ जानेवारीपासून पाइपलाइनला गळती लागल्याने पाणीपुरवठा बंद असून गुरुवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे उपविभागीय अभियंता सतदेवे यांनी सांगितले.

योजनेच्या वीज बिलाची थकीत रक्कम किती या पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीजबिल भरण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी ह्या योजनेचे पाणी वापरणाऱ्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना बनगाव पाणीपुरवठा या व्हॉटसअॅप ग्रुपवर जोडून त्यांच्यात सतत जनजागृती करणे अपेक्षित आहे. परंतु योजनेच्या बिलाची थकीत आकडेवारी पुढे येत नाही.

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater scarcityपाणी टंचाई