शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

२८ गावांवर ६२ लाखांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 6:00 AM

लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उतरतीकळा लागली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींची उदासिनता : शुद्ध पाण्यासाठी नळाचे पैसे भरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावांसाठी सुरू करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना नियोजना अभावी आणि ग्रामपंचायतींच्या उदासिनतेमुळे २७ गावांनाच पाणी पुरवठा करीत आहे. या २७ गावांवर जून अखेरपर्यंत ६१ लाख ८३ हजार २९० रूपये थकीत आहेत.लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उतरतीकळा लागली आहे. आमगाव नगर परिषद व या योजनेचे पाणी वापर करणाऱ्या ग्रामपंचायतींनी पाण्याचे बिल त्वरीत भरून या योजनेला अविरत सुरू ठेवण्याची गरज आहे. या योजनेतून गावकऱ्यांना पाणी पुरविणाºया ग्रामपंचायती आमगाव तालुक्यात २३ तर एक नगर परिषद आहे. ग्रामपंचायत बोरकन्हार या गावावर २ लाख ७३ हजार ६०० रूपये, बाम्हणीवर २ लाख १७ हजार ५२०, शिवणीवर २ लाख ९३ हजार ३६८, चिरचाळबांध ४ लाख ६७०, खुर्शीपार २ लाख ४२ हजार ७७०, जवरी २ लाख ७७ हजार ३८०, मानेगाव २ लाख २४ हजार ४४०, ठाणा ४० हजार ८६०, बोथली १ लाख ५० हजार ५४०, सुपलीपार ४७ हजार २०८, कालीमाटी २ लाख ७ हजार ३४२, किकरीपार ३ लाख २४ हजार ६८०, कातुर्ली ४ लाख ३१ हजार ४६२, मोहगाव ६२ हजार ९००, बंजारीटोला १ लाख २० हजार ४००, ननसरी ८३ हजार ३२०, सरकारटोला २ लाख ४७ हजार ९२०, घाटटेमणी १ लाख ४४ हजार ३५०, पानगाव १ लाख १७ हजार ६९०, फुक्कीमेटा १ लाख १० हजार ९६२, धामनगाव १ लाख ३ हजार ३७०, मुंडीपार १ लाख ९ हजार ९५०, भोसा ३५ हजार २९०, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ७ लाख ८० हजार १४४ रूपये, सातगाव १ लाख २३ जार १०० रूपये, कारूटोला १ लाख १३० रूपये, हेटी १ लाख ३० हजार ७६० रूपये तर आमगाव नगर परिषदेवर ७ लाख ८१ हजार १६४ रूपयाचे बिल आहेत.आमगाव नगर परिषदेत आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे सात लाख बिल इतरांच्या तुलनेत कमी आहे. परंतु या सर्व गावांवर असलेली थकबाकी पाहता साखरीटोला या ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.८ सप्टेंबरपूर्वी थकीत रक्कम भराजून २०१९ अखेर पर्यंत ग्रामपंचायत पातळीवर थकीत असलेला नळाच्या पाण्याचा पैसा तत्काळ जमा करावे. योजना सुरळीतपणे सुरू राहण्यास सहकार्य करावे. अन्यथा येणाऱ्या १५ सप्टेंबर २०१९ पासून थकीत ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतTaxकर