२८ गावांवर ६२ लाखांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:14+5:30

लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उतरतीकळा लागली आहे.

Water lakes worth 2 lakhs are recovered in 4 villages | २८ गावांवर ६२ लाखांची पाणीपट्टी थकीत

२८ गावांवर ६२ लाखांची पाणीपट्टी थकीत

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतींची उदासिनता : शुद्ध पाण्यासाठी नळाचे पैसे भरा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावांसाठी सुरू करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना नियोजना अभावी आणि ग्रामपंचायतींच्या उदासिनतेमुळे २७ गावांनाच पाणी पुरवठा करीत आहे. या २७ गावांवर जून अखेरपर्यंत ६१ लाख ८३ हजार २९० रूपये थकीत आहेत.
लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उतरतीकळा लागली आहे. आमगाव नगर परिषद व या योजनेचे पाणी वापर करणाऱ्या ग्रामपंचायतींनी पाण्याचे बिल त्वरीत भरून या योजनेला अविरत सुरू ठेवण्याची गरज आहे. या योजनेतून गावकऱ्यांना पाणी पुरविणाºया ग्रामपंचायती आमगाव तालुक्यात २३ तर एक नगर परिषद आहे. ग्रामपंचायत बोरकन्हार या गावावर २ लाख ७३ हजार ६०० रूपये, बाम्हणीवर २ लाख १७ हजार ५२०, शिवणीवर २ लाख ९३ हजार ३६८, चिरचाळबांध ४ लाख ६७०, खुर्शीपार २ लाख ४२ हजार ७७०, जवरी २ लाख ७७ हजार ३८०, मानेगाव २ लाख २४ हजार ४४०, ठाणा ४० हजार ८६०, बोथली १ लाख ५० हजार ५४०, सुपलीपार ४७ हजार २०८, कालीमाटी २ लाख ७ हजार ३४२, किकरीपार ३ लाख २४ हजार ६८०, कातुर्ली ४ लाख ३१ हजार ४६२, मोहगाव ६२ हजार ९००, बंजारीटोला १ लाख २० हजार ४००, ननसरी ८३ हजार ३२०, सरकारटोला २ लाख ४७ हजार ९२०, घाटटेमणी १ लाख ४४ हजार ३५०, पानगाव १ लाख १७ हजार ६९०, फुक्कीमेटा १ लाख १० हजार ९६२, धामनगाव १ लाख ३ हजार ३७०, मुंडीपार १ लाख ९ हजार ९५०, भोसा ३५ हजार २९०, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ७ लाख ८० हजार १४४ रूपये, सातगाव १ लाख २३ जार १०० रूपये, कारूटोला १ लाख १३० रूपये, हेटी १ लाख ३० हजार ७६० रूपये तर आमगाव नगर परिषदेवर ७ लाख ८१ हजार १६४ रूपयाचे बिल आहेत.आमगाव नगर परिषदेत आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे सात लाख बिल इतरांच्या तुलनेत कमी आहे. परंतु या सर्व गावांवर असलेली थकबाकी पाहता साखरीटोला या ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

८ सप्टेंबरपूर्वी थकीत रक्कम भरा
जून २०१९ अखेर पर्यंत ग्रामपंचायत पातळीवर थकीत असलेला नळाच्या पाण्याचा पैसा तत्काळ जमा करावे. योजना सुरळीतपणे सुरू राहण्यास सहकार्य करावे. अन्यथा येणाऱ्या १५ सप्टेंबर २०१९ पासून थकीत ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Water lakes worth 2 lakhs are recovered in 4 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.