१६९३ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:39+5:302021-01-15T04:24:39+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतकरिता शुक्रवारी (दि.१५) एकूण ६५३ मतदान केंद्रावरुन मतदान होत आहे. एकूण १६९३ जांगासाठी ही निवडणूक ...

Voting today for 1693 villagers | १६९३ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

१६९३ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

Next

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतकरिता शुक्रवारी (दि.१५) एकूण ६५३ मतदान केंद्रावरुन मतदान होत आहे. एकूण १६९३ जांगासाठी ही निवडणूक होत असली यापैकी ३११ जागा बिनविरोध आल्याने १३८२ जागांसाठी प्रत्यक्षात ३१५३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. निवडणुकी दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी १४३० पाेलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने ५ जानेवारीपासून सुरुवात झाली. सात ते आठ दिवस जाहीर प्रचार केल्यानंतर बुधवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या. त्यानंतर आता शुक्रवारी (दि.१५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार आहे. तर नक्षलप्रभावित देवरी, अर्जुनी या तालुक्यात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलीही अनुचित घटना १४३९ पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्ट्या गुरुवारी रवाना झाल्या.

...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

कोरोनाच्या सावटालाखाली ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायर, थर्मल गणची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी असणार आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीला मतदान करण्यासाठी शेवटचा एक तास राखून ठेवण्यात आला आहे. यासाठी मतदान केंद्रावर पीपीई किटची व्यवस्था करण्यात आली आहे.

....

सोमवारी लागणार निकाल

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार असून सोमवारी (दि.१८) प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुुळे निकालासाठी तीन दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

.....

निवडणूक यंत्रणा सज्ज

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला एकूण ६५३ मतदान केंद्रावरुन निवडणूक होत आहे. यासाठी २७४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहे. तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी सुध्दा केंद्रावर उपस्थित राहतील.

- सुभाष चौधरी, निवडणूक निर्णय अधिकारी

....

पोलीस बंदोबस्त

ग्रामपंचायतच्या निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणुकीसाठी १३९ पोलीस अधिकारी १३०० पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच नक्षलप्रभावित भागात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर काही अतिरिक्त तुकड्या सुध्दा तैनात करून ठेवण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली.

Web Title: Voting today for 1693 villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.