शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त; पारडे कुणाचे जड होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 17:39 IST

गोंदिया विधानसभा मतदारसंघ : मतदानाचा टक्का वाढल्याने कही खुशी, कही गम

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली, तेव्हा शहरी भागातील मतदान केंद्रावर गर्दी कमी दिसून आली. पण, ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मतदारसंघांत ६५.४५ टक्के मतदान झाले होते, तर मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी कायम होती. त्यामुळे ७० टक्क्यांवर मतदान होण्याचा अंदाज बांधला जात आहे. शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदानासाठी वाढलेला उत्साह आणि टक्का कुणाचे पारडे जड करणार, याचीच चर्चा आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात असले, तरी या मतदारसंघात थेट लढत ही महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यात होणार आहे. हे दोघेही सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत समोरासमोर आले आहेत. 

या मतदारसंघात सकाळपासून मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली होती. सकाळी ७ ते ९ या कालावधीत केवळ ५.५२ टक्के मतदान झाले होते, तर शहरी भागातील मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे कमी मतदान झाल्यास नेमके कुणाचे विजयाचे समीकरण बिघडणार याची चर्चा सुरू झाली होती. पण, शहरातील मतदान केंद्रांवर दुपारी १२ वाजेनंतर गर्दी वाढयला सुरुवात झाली. तर, या मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. याही मतदारसंघात महिला मतदारांच्या रांगांनी लक्ष वेधून घेतले होते, तर पुरुष आणि युवा मतदारांमध्ये मतदाना प्रति उत्साह दिसून आला. त्यामुळेच ग्रामीण भागातील मतदारांचा मतदाना प्रति वाढलेला उत्साह नेमके कुणाचे पारडे जड करणार, याची मतदारसंघात चर्चा होती. 

कुणी म्हणतो कांटे की टक्कर, तर कुणी म्हणतो एकतर्फी गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांमध्येही काट्याची टक्कर होईल, असा अंदाज सुरुवातीपासूनच बांधला जात होता. पण, बुधवारी मतदानानंतर हा सामना आता एकतर्फी असल्याची चर्चा मतदारसंघात होती. त्यामुळे नेमका कुणाचा अंदाज खरा ठरतो, हे पाहणे सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

वाढीव मतदान कुणाचा मार्ग मोकळा करणारगोदिया विधानसभा मतदारसंघात जेव्हा ६५ टक्क्यांवर मतदान होते, तेव्हा समीकरण बदलते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यात महिला मतदारांची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिली आहे. या मतदारसंघात सर्वाधिक ३६१ मतदान केंदे असून, ३ लाख २५ हजार ५५६ मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या ही १ लाख ३५ हजार ७३१ आहे. त्यामुळे महिला मतदार नेमका कुणाचा विजयाचा मार्ग मोकळा करतात, है २३ तारखेला मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

मतदान प्रक्रिया सुरळीत गोंदिया विधानसभा मतदार संघात सर्व ३६१ मतदान केंद्रांवर सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया पार पडली, कुठल्याही मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद अथवा गोंधळाची तक्रार नव्हती. निवडणुकीदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

दुपारनंतर बदलला मतदारसंघाचा कलमतदान प्रक्रियेदरम्यान या मतदार संघात दुपारनंतरच कल बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली. मतदारांची गर्दी वाढल्याने बऱ्याच मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजेनं- तरही मतदानाची प्रक्रिया सुरूच होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदानgondiya-acगोंदिया