लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : गावालगतच्या शेतशिवारात बिबट्याने गाईची शिकार केल्याची घटना बुधवारी (दि.२९) रात्री घडली. गाईच्या रक्ताची चटक लागलेल्या त्या बिबट्याने सोमलपूर गावाशेजारी नित्यनेम भटकंती सुरु केल्याने अख्खे गाव दहशतीत असल्याचे राजकुमार लेंडे, गणेश कोकोडे यांनी सांगितले. गावात बिबट्याचे दर्शन होत असल्याची माहिती वनविभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा आजपावेतो बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.गावालगतच्या शेतशिवारात चोपराम कापगते यांच्या मालकीच्या गायीची शिकार बिबट्याने तुलाराम डोंगरवार यांच्या शेतात केल्याची घटना गुरुवारी (दि.३०) उघडकीस आली. गायीची शिकार करुन ती शिकार त्याच ठिकाणी ठेवून बिबट पसार झाला होता हे घटनास्थळावरील दृश्यावरुन दिसून येत होते. शिकार पुन्हा खाण्यासाठी बिबट परत येणार हे माहिती असून सुद्धा वन विभागाने त्याला पकडण्यासाठी पिंजरा न ठेवता त्या परिसरात कॅमेरा लावून ठेवला. नेमकी तीच संधी साधून आपल्या सवयीप्रमाणे बिबट सायंकाळी ७ वाजतादरम्यान अर्धवट ठेवलेल्या शिकारीजवळ आला.मनसोक्त ताव मारुन पहाटे ४ वाजता पसार झाल्याचे दृश्य कॅमेऱ्यांत दिसून आले. परत शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी ७ वाजतादरम्यान मुकेश लेंडे या युवकाला आपल्या घरामागून बिबट जातानी दिसून आला. असे असताना वनविभागाचे कर्मचारी रिकाम्या हाताने गावच्या चौकात गस्त घालत असल्याने गावकरी जाम संतापले आहेत. यापूर्वी सुद्धा काही महिन्यांपूर्वी घरातून गोऱ्हा फरफटत नेऊन त्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. मागील ३-४ दिवसांपासून चक्क गावात बिबट दिसत असल्याने गावकरी जीव मुठीत घेऊन दहशतीत वावरत आहे. वनविभागाने बिबट्याला बंदिस्त करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
सोमलपूर गावात नित्यनेम बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST
गावालगतच्या शेतशिवारात चोपराम कापगते यांच्या मालकीच्या गायीची शिकार बिबट्याने तुलाराम डोंगरवार यांच्या शेतात केल्याची घटना गुरुवारी (दि.३०) उघडकीस आली. गायीची शिकार करुन ती शिकार त्याच ठिकाणी ठेवून बिबट पसार झाला होता हे घटनास्थळावरील दृश्यावरुन दिसून येत होते.
सोमलपूर गावात नित्यनेम बिबट्याचे दर्शन
ठळक मुद्देवनविभाग सुस्त : गावकरी मात्र दहशतीत