शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

गावकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले नागरिक वर्षानुवर्षे आपल्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जि.प.सदस्य तिराले यांनी दल्लाटोला, कोपालगड, आमाटोला या गावांना भेट दिली.

ठळक मुद्देमूलभूत सुविधा कधी मिळणार । जि.प.सदस्यांनी दिली भेट

न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील पिपरीया जिल्हा परिषद क्षेत्राच्या जि.प.सदस्या दुर्गा तिराले यांनी महाराष्टÑ आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील अतिदुर्गम भागातील गावांना भेट देऊन तेथील गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आदिवासी बांधवानी आपल्या व्यथा मांडीत विविध समस्यांचा पाढा तिराले यांच्यासमोर वाचला. समस्या दूर करण्याची मागणी केली.या वेळी कोसमतर्राचे सरपंच कैलास धामडे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल तिराले, सुखीराम कोर्राम, जीवनलाल कोर्राम यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले नागरिक वर्षानुवर्षे आपल्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जि.प.सदस्य तिराले यांनी दल्लाटोला, कोपालगड, आमाटोला या गावांना भेट दिली. दल्लाटोला, कोपालगड येथे गावकऱ्यांची सभा घेतली तेव्हा दल्लाटोला येथील लोकांनी सांगितले की त्यांच्या गावात एक तलाव आहे. त्या तलावाच्या पाण्यातून गावकरी आपली गरज भागवितात. तलावाचे गेट नादुरुस्त असल्याने तलावाचा पाण्याचा अपव्यय होतो. त्याचा गावकºयांना कसलाच उपयोग होत नाही. परिणामी गावकऱ्यांना दरवर्षी पाणी टंचाईला समोरे जावे लागते. गावातील अनेक कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. परिणामी अनेक कुटुंबांना उघड्यावर राहावे लागत आहे. गावात अद्यापही विद्युत पथदिवे लावण्यात आले नाही. तर पक्के रस्ते नसल्याने गावकऱ्यांना पावसाळ्यात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या भागातील वीज पुरवठा नेहमीच खंडित असतो. त्यामुळे या भागात २४ वीज पुरवठा करण्याची मागणी केली. तिराले यांनी गावकºयांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडविण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद