शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भ मिशन २०२३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 6:00 AM

मामर्डे यांनी, विदर्भ राज्य हे कसे विकसित राज्य होईल याचा लेखा-जोखाच मांडला. तर तायवाडे व पटले यांनीही विदर्भ राज्य कसे विकसित होऊ शकते व बेरोजगारी कशी दूर होऊ शकते यावर मार्गदर्शन केले. स्वतंत्र विदर्भ राज्य ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कसे मिळवून घेता येईल यासाठी आंदोलनाचे व इतर कार्यक्रमाचे अ‍ॅक्शन प्लान तयार केले आहे.

ठळक मुद्देराम नेवले : आंदोलन अजून तीव्र करणार

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या ७ वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढा देत आहे. अनेक आंदोलने समितीने केली आहेत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना छत्तीसगड, झारखंड व उत्तरांचल हे तीन राज्य दिले. परंतू विदर्भ राज्य शिवसेनेच्या विरोधामुळे दिले नाही. आता मात्र भाजप-सेना युती तुटली व त्यामुळे भाजपाची विदर्भ विरोधी भूमिका संपुष्टात येईल. विदर्भ मिळण्याचा राजकीय मार्ग मोकळा झाला. अशावेळी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विदर्भ मिशन २०१३ समोर ठेवून आंदोलन अधिक तिव्र करण्याचा निर्धार समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी येथील सभेत बोलून दाखविला.ही सभा सामजिक ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश धुर्वे यांच्या अध्यक्षतेत समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, राजेशकुमार तायवाडे, राजू बरियेकर, पवनकुमार येरपुडे, राधेलाल पटले, रामकृष्ण आगाशे, वासुदेव कुर्वे, भूमेश्वर पारधी, राजेश रहांगडाले, अतिचंद पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी धुर्वे यांनी, विदर्भ राज्य वेगळे झाल्यास कोणकोणते फायदे होतील हे सविस्तर सांगितले. मामर्डे यांनी, विदर्भ राज्य हे कसे विकसित राज्य होईल याचा लेखा-जोखाच मांडला. तर तायवाडे व पटले यांनीही विदर्भ राज्य कसे विकसित होऊ शकते व बेरोजगारी कशी दूर होऊ शकते यावर मार्गदर्शन केले. स्वतंत्र विदर्भ राज्य ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कसे मिळवून घेता येईल यासाठी आंदोलनाचे व इतर कार्यक्रमाचे अ‍ॅक्शन प्लान तयार केले आहे. त्याला नाव दिले अ ाहे ‘विदर्भ मिशन २०२३’विजेचे बिल निम्मे झाले पाहिजे, कर कर्जा नही देंगे, बिजली बिल भी नहीं देंगे, जनजागृती करणे, फलक लावणे, २ डिसेंबरपासून सुरु झाले. २४ डिसेंबर रोजी जिल्हा, तालुका स्तरावर एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण सकाळी १० ते ५ पर्यंत जिल्हास्तरावर विविध मागण्यांसाठी धरणे व आंदोलन, अकोला १५ जानेवारी, अमरावती १७, नागपूर २०, चंद्रपूर २२, गोंदिया २४ जानेवारी.१० फेब्रुवारीला सर्व तालुका, जिल्हा स्तरावर रास्ता रोको, जेल भरो आंदोलन, २५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रेल रोको आंदोलन, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळून ‘संपूर्ण विदर्भ बंद’ हे आंदोलन राबविण्यात येणार आहे. संचालन तायवाडे यांनी केले. प्रास्ताविक पारधी यांनी मांडले. आभार आगाशे यांनी मानले. सभेसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ