शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

रबी पेरणीसाठी बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली.

ठळक मुद्देशेतमजुरांची मजुरी वाढली : परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले, अन् शेतकऱ्यांचे खरीप पीक पाण्यात वाहून गेले. हजारोंचा पेरणी, निगराणीचा खर्चही निघत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महागाईमुळे शेतकºयांना मोठे कष्ट करावे लागत आहे. मात्र हे दुख: विसरुन बळीराजा रब्बीच्या पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे.खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली. परतीच्या पावसाने झोडपले. यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात निर्माण झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक सडून गेले. परतीच्या पावसाने धान मातीमोल झाल्याने पेरणीसाठी झालेला खर्च कसा निघणार याची चिंता शेतकºयांना लागली आहे.धानाचे बहरलेले शेत पावसानंतर उत्पादनहीन झाल्याचे पाहून जिल्ह्यातील शेतकरी हतबल होऊन उरले सुरले धान शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.उत्पादन वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडली.यात ही महागाईने तोंड वर काढले. याशिवाय शेती कामातील रोजगारांचा भाव गगनाला भिडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामाकरिता पुरुषांसाठी ३०० तर महिला रोजगाराकरिता १५० रुपये इतका खर्च लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडत असल्याची वास्तविकता निर्माण झाली. पुढील पिके घेण्याची तयारी करण्यासाठी शेतकºयास आता पेरणीच्या दुप्पट खर्च लागत असल्याने नवीन पेरणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे.तणनाशकांच्या किमतीत वाढपावसामुळे शेतात विविध प्रकारचे तण (गवत) वाढले. त्यामुळे शेती मशागत करण्यात अडथळा निर्माण होत आहे. शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने तणनाशक औषधाद्वारे नष्ट करण्यावर शेतकºयांनी भर दिला. परंतु जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत कृत्रिम टंचाई निर्माण करुन भाववाढ केली. २८० रुपयांना मिळणारा तणनाशकाचा डबा आता ३५० रुपयांपेक्षा अधिक किमतीने खरेदी करावा लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती