शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीवर ‘वीरुगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:20 IST

तालुक्यातील खमारी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांवर कारवाई करुन त्यांना पदावरुन हटविण्यात यावे. या मागणीला घेऊन याच गावातील मोहन तावाडे यांनी मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील पाणी टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देउपसरपंच, सदस्यांवर कारवाईची मागणी : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

ऑनलाईन लोकमतगोंदिया : तालुक्यातील खमारी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांवर कारवाई करुन त्यांना पदावरुन हटविण्यात यावे. या मागणीला घेऊन याच गावातील मोहन तावाडे यांनी मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील पाणी टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कारवाहीचे लेखी आश्वासन मिळत तोपर्यंत पाणी टाकीवरुन उतरणार नाही अशी भूमिका मोहन घेतल्याने पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार मोहन तावाडे यांची पत्नी विमल तावाडे खमारी येथील सरपंच आहे. मात्र त्यांना तिसरे अपत्य झाले. त्यामुळे त्यांना नियमानुसार सरपंचपदावर राहत नाही. यावरुन उपसरपंच व सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला. सदस्यांनी आक्षेप घेण्यापूर्वीच सरपंचानी पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे. तर याच ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास साखरे यांना आधी दोन अपत्ये होती. त्यानंतर १२ फेब्रुवारीला त्यांना तिसरे अपत्य झाले. मात्र त्यांनी अद्यापही पदाचा राजीनामा दिला नाही. जो नियम सरंपचाला लागू होतो तोच उपसरपंच साखरे यांना सुध्दा लागू आहे. मात्र ते प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचा तावाडे यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर २४ तासात कारवाही करुन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांच्या घरी शौचालये नसून त्यांनी वर्षभरापासून घर टॅक्स भरले नाही. त्यामुळे त्यांच्यावर सुध्दा कारवाई करुन पदावरुन दूर करण्यात यावे. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा मोहन तावाडे यांनी निवडणूक आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता. मात्र प्रशासनातर्फे उपसरपंच आणि सदस्यांवर कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मोहनने मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतला लागून असलेल्या पाणी टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत उपसरपंच व तीन सदस्यांवर कारवाही होत नाही. तोपर्यंत पाणी टाकीवरुन खाली उतरणार नाही अशी भूमिका मोहनने घेतली आहे. दरम्यान याची माहिती गावात पसरताच गावकरी ग्रामपंचायतजवळ मोठ्या संख्येनी गोळा झाले. तसेच मोहनला खाली उतरण्याची विनंती करीत होते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी ४ वाजता तहसीलदार रहांगडाले यांच्या लेखी आश्वासनंतर मोहनने विरुगीरी आंदोलन मागे घेत तो टाकीवरुन खाली उतरला.महिलांचे मोहनला समर्थनखमारी येथील विजू उके, सविता कोरे, रेखा बहेकार, वनमाला बोरकर, आशा शिवणकर, भागरथा लाडे, अनिता तरोणे यांच्यासह इतर महिलांनी मोहन तावाडे यांनी केलेल्या मागण्या योग्य आहे. नियमानुसार उपसरपंच आणि सदस्यांवर प्रशासनाने कारवाही करण्याची गरज असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.सरपंचावर अविश्वास पारितखमारी येथील सरपंच विमल तावाडे यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. यासाठी मंगळवारी खमारी ग्रामपंचायतमध्ये सभा घेण्यात आली. त्यात सदस्यांनी सरपंच तावाडे यांच्या विरोधात मतदान केल्याने त्यांच्यावरील अविश्वास ठरावा पारित करण्यात आला. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोंदियाचे तहसीलदार उपस्थित होते.