लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ असून चौक व रस्त्यांवर गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही नागरिक वाहनांनी विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे सत्र अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी सुरू केले असून २ दिवसांत शेकडो वाहन ताब्यात घेऊन दंड वसुल केले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशात कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनावर आळा बसावा म्हणून २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ लागू करण्यात आली आहे. अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाणे हद्दीत ‘लॉकडाऊन’चे पालन समस्त नागरिकांकडून व्हावे या हेतुने पोलीस निरीक्षक महादेव तोंदले व त्यांच्या सहकाऱ्यांकडून गावागावांत जागृती व नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे.असे असतानाही काही लोक विनाकारण लहान मोठे कारण सांगून मोटारसायकलने रस्त्यावर फिरत आहेत. अशांवर अंकुश बसावा यासाठी वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.यांतर्गत, अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी २ दिवसांत शेकडो वाहन ताब्यात घेऊन दंड वसूल केला आहे.यात ९८ मोटारसायकल विनाकारण फिरत असताना आढळल्याने मोवाका कलम २०७ अन्वये ताब्यात घेण्यात आल्या असून ३४ वाहनांवर मोकावा अन्वये कारवाई करून चालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या वाहन चालकांचा परवाना व कागदपत्रांची पडताळणी करून यापुढे घराबाहेर पडू नका अशी तंबी देऊन सायंकाळी वाहन परत करण्यात आले.सदर मोहीम पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रशांत भुते, पोउपनी देवीदास शेवाळे, अशोक अवचार, फौजदार माणिक खरकाडे, विजय कोटांगले, महेंद्र सोनवाने, चिचमलकर, महेंद्र सोनवाने, चव्हाण, घनश्याम मुळे, श्रीकांत मेश्राम, भोयर, सलामे, शेंडे, खोटेले, बोरकर इतर पोलीस कर्मचारी सक्तीने राबवित आहेत.
विनाकारण फिरणाऱ्यांचे वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST
आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशात कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनावर आळा बसावा म्हणून २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांचे वाहन जप्त
ठळक मुद्देअर्जुनी-मोरगाव पोलिसांची कारवाई । शेकडो जणांवर दंडात्मक कारवाई