लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करीत असलेल्या वाहनाला गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने पकडले. कचारगड मार्गावर मंगळवारी (दि.६) रात्री ही कारवाई करण्यात आली.वनपरिक्षेत्राधिकारी एस. एच. पिंजारी, वनरक्षक सी.व्ही.ढोमणे, ए.एन.घोडेस्वार, के.जी.सूर्यवंशी, पी.एम.हुमणे, वनमजूर आर.व्ही.तुपटे व पी.पी.कटरे हे सामुहिकरित्या मंगळवारी (दि.६) रात्रीची गस्त करीत असताना कचारगड मार्गावर कक्ष क्रमांक ४४७ व ४४८ लगत अवैधरित्या साग वृक्षाची कत्तल करुन साग इमारती माल १० नग (१.०७२ घमी) टाटा ४०७ पिकअप वाहन क्रमांक एमएच ४०- वाय ४८९९ मध्ये भरलेले दिसले. त्यासोबत काही अज्ञात इसम व चालक मोटारसायकलचा आवाज व प्रकाश बघून घनदाट जंगलात फरार झाले.पथकाने गाडी जप्त करुन सालेकसा कार्यालयात लावून सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत गोंदिया वनविभागाचे फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल महासकर यांनी गुन्हेगारांचा शोध लावण्याबाबत मदद केली व पुढील तपास सुरु आहे.मुलाने केले फिनाईलचे सेवनगोंदिया : सिंगलटोली आंबेडकर वॉर्डातील नीलम प्रकाश नंदेश्वर (१७) याने फिनाईलचे सेवन केल्याने ५ आॅगस्ट रोजी रात्री त्याला येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
सागवान भरलेले वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:02 IST
अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करीत असलेल्या वाहनाला गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने पकडले. कचारगड मार्गावर मंगळवारी (दि.६) रात्री ही कारवाई करण्यात आली.
सागवान भरलेले वाहन पकडले
ठळक मुद्देकचारगड मार्गावरील घटना : वाहन व सागवान केले जप्त