शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

कुपोषणमुक्तीसाठी मार्चपर्यंत सुरू राहील ‘व्हीसीडीसी’

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

राज्यभरात कुपोषणाच्या अतितीव्र श्रेणीला रोखण्यासाठी बालकांना सामान्य श्रेणीत आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात...

३१९ बालके कुपोषित : मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णयदेवानंद शहारे गोंदियाराज्यभरात कुपोषणाच्या अतितीव्र श्रेणीला रोखण्यासाठी बालकांना सामान्य श्रेणीत आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रांना (व्हीसीडीसी) मार्च २०१६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे सॅम श्रेणीच्या बालकांचा उपचार व व्यवस्थापनासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले होते. केंद्रांमध्ये सॅम श्रेणीच्या बालकांना अतिरिक्त आहार दिला जात होता. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध निधीतून सुरू करण्यात आली होती. सन २०१५-१६ मध्ये केंद्र सरकारद्वारे मंजूर पीआयपी अनुसार राष्ट्रीय अभियानांतर्गत निधी मंजूर झाला नाही व याच विषयाला घेवून सदर बैठक ठेवण्यात आली होती. बैठकीतील चर्चेनुसार सन २०१५-१६ मध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू ठेवण्यासाठी विविध स्त्रोतांतून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन अधिकारी यांना ग्राम बालविकास केंद्रांसाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या. आदिवासी जिल्ह्यांत टीएसपी-ओटीएसपी यातून प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करवून देणे तसेच केंद्र मार्च २०१६ पर्यंत सुरू ठेवण्याच्या संदर्भात आदेश देण्यात आले आहे. २३६ बालके तीव्र कुपोषितकुपोषण निर्मूलन कार्यक्रमांतर्गत शून्य ते सहा वर्षाच्या वयाच्या एक लाख एक हजार ३३४ बालकांपैकी ९१ हजार ४५४ बालके आॅक्टोबर महिन्यात सामान्य आढळले. तर कुपोषणाच्या मध्यम अतितीव्र श्रेणीत (मॅम) २३६ व अतितीव्र कमी वजन श्रेणीत (सॅम) ८३ बालके आढळले. याचप्रकारे वय व वजन यानुसार पाच हजार ९५२ बालके कमी वजन श्रेणीत (एमयूडब्ल्यू) तसेच तीव्र कमी वजन श्रेणीत (एसयूडब्ल्यू) एक हजार १६० बालके आढळले आहेत.अर्जुनी-मोर व आमगावात सर्वाधिक कुपोषितकुपोषणाच्या बाबतीत जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव तालुके सर्वाधिक पुढे आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक मॅम श्रेणीचे ६१ व सॅम श्रेणीचे १२ बालके आढळले. आमगाव तालुक्यात मॅम श्रेणीचे ३५ व सॅम श्रेणीचे १९ बालके आढळले. या बालकांमध्ये कमी वजनासह उंचीसुद्धा खूप कमी असल्याचे आढळले. तिरोडा तालुक्यामध्ये दोन्ही श्रेणींमध्ये सर्वात कमी १४ बालके कुपोषित आढळले. अशाचप्रकारे वय व वजनाच्या दृष्टीने अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एमयूडब्ल्यू श्रेणीचे ८६७ व एसयूडब्ल्यू श्रेणीमध्ये क्रमश: ८८२ व २०८ बालकांचा समावेश आहे.