शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

६५०० फ्रंट लाईन कोरोना योद्धांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2020 5:00 AM

शासकीय कर्मचारी : कोरोनाची लस आल्यानंतर सर्वप्रथम जिल्ह्यातील तीन मुख्य शासकीय रुग्णालयातील डॉक्टर,नर्सेस, आरोग्य कर्मचारी तसेच एक उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय आणि ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.  खासगी कर्मचारी : काेरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे डाक्टर, आरोग्य सेविका, व रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. जवळपास ६० खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना पहिल्याच टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. 

ठळक मुद्देडॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य : आरोग्य विभागाने पाठविली शासनाकडे माहिती

n  अंकुश गुंडावार    लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाची लस लवकरच येणार असून लस आल्यास आधी ती कुणाला द्यायची या दृष्टीने शासन व प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने ६५०० डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी राज्याच्या प्रधान सचिवांकडे पाठविली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात फ्रंट लाईन याेध्दा म्हणून डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले. याचीच जाणीव ठेवत जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. 

कोरोना परतीच्या मागार्वर

ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. ३९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर २६८४ नवीन बाधितांची भर पडली. रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के असल्याने जिल्ह्यातून कोरोना परतीच्या मार्गावर आहे. 

कोरोनाची लस आल्यास ती आधी कुणाला प्राधान्याने द्यायची याकरिता प्रधान सचिवांनी माहिती मागविली होती.जिल्ह्यातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात प्रथन लस दिली जाणार आहे त्या दृष्टीने नियोजन केले आहे.           - दीपक कुमार मीणा,                         जिल्हाधिकारी गोंदिया. 

लस  येईल तेव्हा...

कोरोनाची लस आल्यास ती सर्व प्रथम आरोग्य विभागात कार्यरत डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांना देण्यात येईल. शासकीय आणि खासगी रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा नावाचा डॉटा तयार केला जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडे हे सोपविण्यात आले असून ते सध्या याचे नियोजन करीत आहे.

कोणाला मिळणार लस?

शासकीय कर्मचारी : कोरोनाची लस आल्यानंतर सर्वप्रथम जिल्ह्यातील तीन मुख्य शासकीय रुग्णालयातील डॉक्टर,नर्सेस, आरोग्य कर्मचारी तसेच एक उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय आणि ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. खासगी कर्मचारी : काेरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे डाक्टर, आरोग्य सेविका, व रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. जवळपास ६० खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना पहिल्याच टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. 

जिल्हा स्तरावर काय  तयारी सुरू आहे? जिल्हा आरोग्य विभागाने सध्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर,नर्सेस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा डॉटा संकलीत करणे सुरू केले आहे. याच अनुषंगाने जवळपास ६५०० जणांच्या नावांची यादी शासनाकडे पाठविली आहे.जिल्हा आरोग्य विभागात यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केले जाणार आहे.लसीचा पुरवठा शासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे लस उपलब्ध होताच ती वेळेत कशी देता येईल यासाठी नियोजन सुरू आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या