बाधितांचा ग्राफ अपडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 05:00 AM2020-10-24T05:00:00+5:302020-10-24T05:00:09+5:30

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. तर तब्बल ७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात काय होणार अशी चिंता जिल्हावासीयांमध्ये होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांचा ग्राफ खालावल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला. मात्र मागील आठवडाभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण आहे.

By updating the graph of the victims | बाधितांचा ग्राफ अपडाऊन

बाधितांचा ग्राफ अपडाऊन

Next
ठळक मुद्दे९५ कोरोना बाधितांची भर : ११५ बाधितांनी केली मात : दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू 

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ आणि घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी (दि.२३) जिल्ह्यात ९५ कोरोना बाधितांची भर पडली. दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ११४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. 
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. तर तब्बल ७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात काय होणार अशी चिंता जिल्हावासीयांमध्ये होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांचा ग्राफ खालावल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला. मात्र मागील आठवडाभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी जिल्ह्यात आढळलेल्या ९५ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५० कोरोना बाधित गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १, गोरेगाव ४, आमगाव २, सालेकसा ५, देवरी १४, सडक अर्जुनी १०,अर्जुनी मोरगाव ६ आणि बाहेरील जिल्ह्यातील तीन कोरोना बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९१४४ कोरोना बाधित आढळले असून ७९९८ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात १०२९ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहे. ११० स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ३६६१४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी २७७९८ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ३२६१४ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९२८१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. 
रुग्ण बरे होण्याचा दर ८६.१७ टक्के 
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ९ हजारावर गेला असला तरी यापैकी ८ हजार कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८६.१७ टक्के आहे. तर मृत्यू दर १.२३ टक्के आणि रुग्णवाढीचा डब्लिंग दर ६३.३ टक्के आहे. 
आरोग्य तपासणीचा दुसरा टप्पा 
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझी कुटुंब माझी जवाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. यातंर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात १४ लाख ११ हजार ४२५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर १६ ऑक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्यातील मोहीम सुरू करण्यात आली असून ८ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 

Web Title: By updating the graph of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.