शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार हेक्टरमधील धानपिकांवर अवकाळी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:05 IST

धान व भाजीपाला उत्पादक चिंतित : वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी (दि.३) सकाळी वादळी वाऱ्यासह तुरळक स्वरूपात पावसाची हजेरी लावली, तर दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे रब्बीतील ५२ हजार हेक्टरमधील धान आणि भाजीपाला पिकांवर अवकाळीचे संकट कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात गुरुवार ते शनिवारी दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. गुरुवारी सकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात यंदा ४६ हजार हेक्टरवर रब्बी धान व सहा हजार हेक्टरवर भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली आहे. रब्बीतील धानपीक सध्या गर्भावस्थेत आहे, तर भाजीपाला पिकासाठी सुद्धा अनुकूल वातावरण असल्याने भाजीपाल्याचे पीक चांगले आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकावर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तर वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा धानपिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोंडचा घासतर अवकाळीमुळे हिरावला जाणार नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे.

अशी घ्या काळजीवादळी वारे, पावसात झाडाखाली थांबू नये, विजा चमकताना विद्युत उपकरणांचा वापर करू नये, शेतकऱ्यांनी शेतात माल असेल तर तो सुरक्षित ठिकाणी हलवावा, जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. पावसात काही नुकसान झाले असेल तर तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी.

पुढील दोन दिवस येलो अलर्टजिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

विजा चमकत असतील तर जमिनीशी कमी संपर्क ठेवाविजा चमकत असताना आपण मोकळ्या जागेत असाल तर सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत. आपले डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. लोंबकळणाऱ्या, लटकणाऱ्या तारांपासूनही दूर राहावे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र