शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:49 PM

शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र मागील वर्षीपासून शासनाने गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते.

ठळक मुद्देडीबीटीमुळे झाला होता गोंधळ : विद्यार्थी गणवेशाविना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र मागील वर्षीपासून शासनाने गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते. हा निर्णय बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने प्रस्ताव पाठविला. मात्र यामुळे राज्यातील ३६ लाख २३ हजार ८८१ विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविना गेला. त्यानंतर केंद्र सरकारने नुकताच गणवेशाचा निधी शालेय व्यवस्थापन समित्यांना देण्याचे निर्देश दिले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनातर्फे दोन जोडी मोफत गणवेश दिले जाते. गणवेशाकरिता शालेय व्यवस्थापन समितीला प्रती विद्यार्थी ४०० रुपये निधी उपलब्ध करुन दिला जात होता. यंदा शासनाने गणवेशाच्या निधीत यंदा २०० रूपयांनी वाढ केली. गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीला दिली जात असल्याने समिती यात घोळ करीत असल्याच्या तक्रारी होत्या.परिणामी शासनाने मागील वर्षीपासून डीबीटी अंतर्गत गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरूवात केली. परंतु काही बँकाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे गणवेशाची रक्कम डीबीटीमार्फत जमा करू नये, तर शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फतच गणवेशाची रक्कम वाटप करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव शिक्षण संचालनालय महाराष्टÑ राज्य पुणे यांनी केंद्र सरकारला पाठविला होता.या प्रस्तावावर केंद्र सरकारचे उत्तर येण्याच्या प्रतिक्षेत राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या. हे उत्तर येईपर्यंत गणवेशाची रक्कम वळती करू नये, असे निर्देश महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे समन्वयक राजेंद्र माने यांनी व्हॉटसअ‍ॅपद्वारे दिले होते.त्यामुळे शाळा सुरू होऊनही गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. मात्र नुकतीच या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता शाळा व्यवस्थापन समितीच गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना देणार आहे.२१७ कोटीचा निधी पडूनचस्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जातीचे मुले, अनुसूचित जमातीची मुले व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जाते. प्रती गणवेश खरेदीसाठी ३०० रुपये असे एकूण दोन गणवेशासाठी ६०० रुपये यंदा दिले जाणार आहेत. राज्यातील ३६ लाख २३ हजार ८८१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी २१७ कोेटी ४३ लाख २९ हजार रूपये मंजूर केले आहेत. परंतु यातील रक्कम आतापर्यंत शाळा व्यवस्थापन समित्यांना वाटप करण्यात आली नाही.सात दिवसात पैसे वर्ग करामहाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी २६ जून रोजी घेतलेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे सात दिवसात शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत.१५ आॅगस्टपर्यंत सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेशसंदर्भात उपयोगी प्रमाणपत्र शिक्षण विभागाला सादर करायचे आहे.

टॅग्स :Schoolशाळाgovernment schemeसरकारी योजना