एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 09:52 PM2019-07-30T21:52:40+5:302019-07-30T21:53:10+5:30

शहराच्या हद्यस्थानी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे यापूर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे.त्यामुळे लोकांची कामासाठी होणारी पायपीट थांबून कामासाठी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम वाचविण्यास देखील मदत झाली आहे.

Under the same roof, people's works will be speeded up | एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार

एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार

googlenewsNext
ठळक मुद्देपरिणय फुके : नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, नागरिकांची पायपीट थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराच्या हद्यस्थानी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे यापूर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे.त्यामुळे लोकांची कामासाठी होणारी पायपीट थांबून कामासाठी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम वाचविण्यास देखील मदत झाली आहे. प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालये एकाच छताखाली आल्यामुळे लोकांची कामे गतीने होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मंगळवारी (दि.३०) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले हे होते. या वेळी प्रामुख्याने खा. सुनील मेंढे, आ.संजय पुराम व विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय सनदी सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, ेजि.प.पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे उपस्थित होते. पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, प्रशासकीय इमारती अभावी विविध शासकीेय विभागाची कार्यालये भाड्याच्या इमारतीत शहरात ठिकठिकाणी सुरू होती. ही समस्या दूर करण्यासाठी प्रशस्त प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. मात्र या इमारतीची देखभाल करणे तितकेच कठीण काम आहे.
या इमारतीत २८ विविध कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. या इमारतीत अग्नीशमन यंत्र बसविले आहेत. विविध साहित्य कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यासह फर्निचर देखील एकसारखे बसविले आहे.इमारतीच्या परिसरात ६ दुकाने तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक दुकान महिला बचत गटासाठी राखीव ठेवण्यात यावे.बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करणे सोईचे होईल. दुसरे दुकान दिव्यांग बांधवांना उपलब्ध करु न दयावे, तेथे एखादे झेरॉक्स सेंटर सुरु करुन त्याला रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमगाव व सालेकसा तहसील कार्यालय इमारतीचे काम पुर्णत्वास आले आहे. लवकरच या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बडोले म्हणाले,या इमारतीत दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट लावण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना येथे कामासाठी ये-जा करणे सोयीचे होणार आहे.प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी मानले.
सिंधी समाजबांधवांना आखिव पत्रिकांचे वाटप
या वेळी आयोजित कार्यक्रमात शासन निर्णयानुसार गोंदिया शहरातील सिंधी समाजबांधवांना आखिव पत्रिकांचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी आमदार हेमंत पटले व रमेश कुथे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,माजी नगराध्यक्ष के.बी.चव्हाण,माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर उपस्थित होते.

Web Title: Under the same roof, people's works will be speeded up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.