शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार

By admin | Updated: December 10, 2014 23:00 IST

दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथील मृतक भरत हलकाई बसेने याने ३ नोव्हेंबर २०१४ रोजी लोधीटोला धापेवाडा शिवारात विद्युत खांबाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

परसवाडा : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथील मृतक भरत हलकाई बसेने याने ३ नोव्हेंबर २०१४ रोजी लोधीटोला धापेवाडा शिवारात विद्युत खांबाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत दवनीवाडा पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. पण तक्रारकर्त्यांनी हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपी भरतची पत्नी गिरजा व तिचा भाऊ यांनीच संगनमताने हत्या केली असून त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता दुसऱ्यावरच ठपका ठेवला आहे, असा आरोप भरतचा भाऊ गणेश हलकाई बसेने व भरतच्या पहिल्या पत्नीचा भाऊ मेघश्याम मस्करे यांनी केला आहे.
या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मृतकाच्या पहिल्या पत्नीचा भाऊ मेघशाम धनलाल मस्करे रा. मुरदाडा हे दवनीवाडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना दोन ते तीन तास बसवून ठेवले. गंगाझरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक डोंगरे पाटील यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करून मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून दिले. पण तक्रारकर्त्यांना माहिती देण्यात आली नाही. पंचनामा बरोबर न करता पंचांची केवळ स्वाक्षरी घेण्यात आली.
पंच धापेवाडा येथील दुर्गा बबारे व महेंद्र गयगये यांनी तक्रारकर्त्यांना सांगितले की, मृतक भरतचा एक हात तुटलेला व लिंगस्थान पूर्णपणे मुरकुटलेले होते. रुग्णालयातील परिचराचे हात तुटलेला असल्याचे सांगितले. पण डॉक्टरांनी पंचनाम्याच्या आधारावरच उत्तरीय तपासणी अहवाल तयार केले आहे. याबद्दल पोलीस अधीक्षकांशी तक्रारकर्त्यांनी ४ नोव्हेंबर २०१४ रोजीच भेटले. जोपर्यंत योग्य कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतकाचा अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण पोलीस अधीक्षकांनी कारवाई होईलच, अंतिम सत्कार करा, असे आश्वासन दिले होते. पण अद्याप योग्य कार्यवाही झाली नाही.
मृतकाजवळ मिळालेल्या चिठ्ठीबद्दल पोलिसांनी तक्रारकर्त्यांना सांगितले नाही. यावरून गावातील नागरिक संशय घेत आहे. दवनीवाडा पोलिसांनी क्रिष्णा मारोती पापडकर या महिलेला व प्रभू सोरले यांचा प्रकरणात हात असल्याचा संशय घेवून कारागृहात रवानगी केली. पण या दोन्ही इसमांचा मृतक भरतशी काही घेणे देणे नाही. मृतक भरत शांत स्वभावाचा होता. मग या प्रकरणात आरोपीला सोडून संन्याशाला फाशी का, अशा सवाल मुरदाडा, धापेवाडा, महालगाव, लोधीटोला येथील नागरिकांनी करुन पोलिसांवर व डॉक्टरांवर ठेवत चुकीच्या पद्धतीने तपास व चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराला मोकळीक दिल्याच्या आरोप केला जात आहे. याच्या निषेधार्थ गुरूवाारी ११ डिसेंबर २०१४ रोजी महालगाव बसस्थानकावर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. २५० नागरिकांनी स्वाक्षरी करून या आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)