लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरात केमिकलयुक्त कोबीची विक्री होत असल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असतानाच या प्रकाराची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी भाजीविक्रेत्याच्या दुकानात जाऊन पानकोबीची पाहणी केली. सोमवारी (दि.४) करण्यात या आलेल्या या कारवाईत अधिकाºयांनी पानकोबीची पाहणी करीत दोन नमूने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे.श्रीरामटोली निवासी बलोकचंद लिल्हारे यांनी खरेदी केलेली पानकोबी त्यांना केमिकलयुक्त वाटली होती. हा प्रकार शहरात चांगलाच गाजला होता व वृत्तपत्रातूनही हा प्रकार उजेडात आला होता. या बातमीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा अधिकारी अखिलेश राऊत व पियूष मानवटकर यांनी सोमवारी (दि.५) आमगाव गाठले. अधिकाºयांनी भाजी विक्रेते रमेश चोरवाडे यांच्या दुकानातील १०-१५ पानकोबींना कापून त्याची पाहणी केली. तसेच पानकोबीचे दोन नमूने घेतले.घेण्यात आलेले हे नमूने ते नागपूरच्या प्रादेशिक लोकस्वास्थ प्रयोगशाळेत पाठविणार आहेत. आता या नूमन्यांची तपासणी केल्यानंतर येणाºया अहवालावरूनच पानकोबीत केमिकल होते काय याची पुष्टी होणार. त्यावरूनच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे राऊत यांनी सांगीतले.
पानकोबीचे घेतले दोन नमूने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:12 IST
शहरात केमिकलयुक्त कोबीची विक्री होत असल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असतानाच या प्रकाराची दखल .....
पानकोबीचे घेतले दोन नमूने
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाने केली पाहणी : नमूने पाठविणार प्रयोगशाळेत