शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोघा आरोपींना केले तडीपार; आरोपींच्या तडीपारीचा आकडा वाढताच, तीन महिन्यांसाठी राहणार जिल्हा हद्दीबाहेर

By कपिल केकत | Updated: February 29, 2024 20:41 IST

जिल्हा पोलिसांकडून आरोपींच्या तडीपारीची कारवाई सुरू असून हा आकडा वाढतच चालला आहे.

गोंदिया: जिल्ह्यातील गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यासाठी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी कंबर कसली असून, जिल्हा पोलिसांनी तसे आदेश दिले आहेत. यातूनच जिल्हा पोलिसांकडून आरोपींच्या तडीपारीची कारवाई सुरू असून हा आकडा वाढतच चालला आहे. अशातच दवनीवाडा पोलिसांनी आणखी दोघा सराईत गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी तडीपार केले आहे.

दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बिर्सी येथील रहिवासी आरोपी रामेश्वर उर्फ छोटू आसाराम हटेले व ग्राम मुरदाळा येथील रहिवासी दिलीप सकटू मस्करे (५१) यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर कित्येकदा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात काहीच सुधारण होत नव्हती. परिणामी परिसरातील लोकांमध्ये दहशत असून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. यावर दवनीवाडा पोलिसांनी त्यांना हद्दपार करण्यासाठी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ कलम ५७ (अ), (१) अन्वये हद्दपार प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांनी दोन्ही प्रस्तावांची प्राथमिक चौकशी पूर्ण करून आरोपींना दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याची शिफारस केली होती. मात्र उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दोघांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले व तसे आदेश बुधवारी (दि.२८) काढले.

दोघांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत दाखलयातील आरोपी रामेश्वर आसाराम हटेले याच्यावर मारहाण करून दुखापत करणे, जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देणे, जीवे ठार करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच दिलीप सकटू मस्करे याच्याविरुद्ध अवैधरीत्या दारूविक्री, गैरपणे अटकाव करणे, विनयभंग, बलात्कार करणे, दुखापत, हमला करण्याची तयारी करून गृह अतिक्रमण करणे अशा प्रकारचे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी