बिरसी-फाटा : शहरात अवैधरीत्या दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस कंबर कसून कारवाया करीत आहेत. अशातच पथकाने गुरुवारी (दि.१८) सकाळी शहरातील संत रविदास वॉर्डात धाड घालून मोहा सडवा व दारू गाळायचे साहित्य असा दोन लाख एक हजार २०० रुपयाचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दिलीप घनश्याम बरेकर याच्या घरी धाड घालून ९२ प्लास्टिक पोत्यात एकूण १८४० किलो सडवा मोहफूल, हातभट्टी साहित्य, ३ गॅस सिलिंडर, हातभट्टी दारू असा एकूण एक लाख ५३ हजार २०० रुपयाचा माल जप्त केला. तर मनीषा धीरज बरेकर हिच्या घरी धाड घालून ३० प्लास्टिक पोत्यात ४८ हजार रुपये किंमतीचा ६०० किलो सडवा जप्त केला. अशाप्रकारे एकूण दोन लाख एक हजार २०० रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
दोन लाखाचा सडवा व साहित्य जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:19 IST