लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील मासुलकसा गावाजवळील पुलाला कारने धडक दिल्याने दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.७) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये सासू सुनेचा समावेश आहे.भारती रामसेवक चतुर्वेदी (६५) व निता महेश चतुर्वेदी रा.हरिहरनगर नागपूर अशी अपघात ठार झालेल्या सासू सुनेची नाव आहे. तर पलक महेश चतुर्वेदी (१३) व महेश रामसेवक चतुर्वेदी (४७) असे अपघातात गंभीर जखमी असलेल्यांची नाव आहे.प्राप्त माहितीनुसार हरिहरनगर नागपूर येथील चतुर्वेदी परिवार राजनांदगावरुन नातेवाईकांना भेटून मंगळवारी नागपूरला परत येत होते. दरम्यान देवरीपासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या मासुलकसा गावाजवळ रस्त्यावरील पुलाला कारची धडक होऊन कार खाली पाण्यात कोसळली. या अपघातात भारती रामसेवक चतुर्वेदी (६५) व निता महेश चतुर्वेदी यांचा जागीच मृत्यू झाला.पलक महेश चतुर्वेदी (१३) व महेश रामसेवक चतुर्वेदी (४७) हे गंभीर जखमी झाले. त्यांना देवरी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी देवरी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
कारची पुलाला धडक दोन ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST