शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘आमची शाळा आदर्श शाळा’ स्पर्धेत २५५ शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 21:58 IST

शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे काय, शाळेमध्ये मिटरसह विद्युतीकरण केले असून विद्युत पुरवठा सुरु आहे काय, सर्व वर्गखोल्यांमध्ये विद्युत व पंखे सुरू आहेत काय,शाळेतील सर्व वर्गखोल्यांचे रंगकाम केले असून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भिती, आवश्यक शैक्षणिक तक्ते, तरंग चित्रे इत्यादींचा समावेश आहे.

ठळक मुद्देअदानी देणार पुरस्कार : जिल्ह्यातील ८५ केंद्रातील जि.प.शाळांचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर ‘आमची शाळा आदर्श शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाची संकल्पना जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी मांडली.जिल्ह्यातील ८५ केंद्रांमधील २५५ शाळा या स्पर्धेत आहेत.या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०४८ शाळांपैकी ८५ केंद्रामधील २५५ शाळा स्पर्धेत आहेत. या उपक्रमासाठी १०० गुण देण्यात आले आहेत. त्यातील ५८ गुण हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पडताळणीवर तर ४२ गुण हे शाळेच्या भौतिक सोयीसुविधेवर देण्यात आले आहे. या उपक्रमातील प्रत्येक शाळा दर महिन्याच्या ५ तारखेला स्वत:च्या शाळेचे स्वंयमुल्यांकन करून दिलेल्या प्रश्नांची माहिती भरण्यात आली आहे. ज्या शाळांना सर्वाधीक गुण मिळतील अशा शाळांचे फेर मुल्यांकन जिल्हा परिषदतर्फे असलेल्या समितीने केले आहे. यंदाच्या सत्रासाठी प्रायेगीक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जर ह्या उपक्रमाला भरघोष प्रतिसाद मिळाला तर पुढच्या वर्षीही या उपक्रमाला जोमाने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेला पुरस्कार देण्याचाही निर्णय घेण्याचा निर्णय सुरू आहे. शाळेत भौतिक सुविधा असणे आवश्यकच आहे. याकडे लक्ष देण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे काम सुरू आहे.शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे काय, शाळेमध्ये मिटरसह विद्युतीकरण केले असून विद्युत पुरवठा सुरु आहे काय, सर्व वर्गखोल्यांमध्ये विद्युत व पंखे सुरू आहेत काय,शाळेतील सर्व वर्गखोल्यांचे रंगकाम केले असून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भिती, आवश्यक शैक्षणिक तक्ते, तरंग चित्रे इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बस्कर पट्या, डेस्कबेंच उपलब्ध आहेत काय, स्वच्छ व निर्जतूंक पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते काय, शाळा डिजीटल आहे काय, शालेय परसबाग व बाग स्थायी स्वरुपात उपलब्ध आहे काय यावर मुल्यांकन केले आहे.मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे काय, स्वच्छतागृहामध्ये कमोड टॉयलेट, हॅन्ड्रील्स, कमोड चेअरची सुविधा आहे काय, स्वयंपाकगृहात अन्य धान्य साठवणूक व वस्तूवरील नामनिर्देशन सुव्यवस्थीत केले का,अन्य धान्य शिजवितांना पूर्णपणे स्वच्छता राखली जाते का,उरलेल्या निरुपयोगी अन्नाची योग्य विल्हेवाट करण्यात येते का, पोषण आहार शासनाच्या निकषानुसार देण्यात येत असून त्या संबंधी नोंदी ठेवण्यात येतात का, शासन निकषानुसार स्वयंपाकगृहात शालेय पोषण आहार तक्ता (मेनू) लावण्यात आला का, आठवड्यातून एकदा पुरक आहार देण्यात येतो का याची खात्री करुनच गुण देण्यात येणार आहे.शाळेतील ग्रंथालयात किमान २०० पुस्तके असावेत. पुस्तकांचे विषयनिहाय वर्गीकरण करुन पुस्तकाची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली का, ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग विद्यार्थी करतात का,शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग नोंदविला असून शिष्यवृत्तीसाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली का, शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत सहभाग नोंदविला असून नवोदय विद्यालयासाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली का,विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आहे का,नाविण्यपुर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अनुसरुन शाळा पातळीवरती उपक्रम घेण्यात येतात का,विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, क्षेत्रभेट इत्यादीचे आयोजन करण्यात येते का, शासकीय उपक्रमांना अनुसरुन गावपातळीवर शाळेद्वारे प्रभातफेरी, समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात का, त्याच्या नोंदी फोटोसह ठेवण्यात येतात काय अशा विविध मुद्यांवर मूल्यांकन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छताविद्यार्थ्याचे गणवेश स्वच्छ व निटनेटके आहे काय, विद्यार्थ्यांची वैयक्तिक तपासणी केली जाते काय (आठवड्यातून एकदा-दोनदा), लोकसहभागाकडे नजर टाकतांना शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा घेण्यात येते काय, माजी विद्यार्थी संघातर्फे शाळेच्या विकासात रोख, वस्तू स्वरुपात मदत करण्यात आली काय, माजी विद्यार्थी संघातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत काय यावरही गुण दिले आहेत.शाळांना कागदपत्रांपासून मुक्तताशिक्षकांना विविध कामे असल्यामुळे त्यांच्यावर या उपक्रमाची माहिती देण्याचे काम आहे.त्यांना अधिक काम होऊ नये यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून शाळांकडून माहिती भरुन घेण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही शाळा कागदोपत्री गुंतल्या नाहीत.मुकाअ डॉ.राजा दयानिधी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला आमची शाळा आदर्श शाळा’ उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात राबविला जात आहे.यातील पुरस्कार प्राप्त शाळांना अदानी समूहाकडून बक्षिसे दिले जाणार आहेत.-राजकुमार हिवारेशिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.गोंदिया.

टॅग्स :Schoolशाळा