सडक अर्जुनी, तालुक्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फूटाळा / सौंदड येथील गाव तलावात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज ता. 03 ला दुपारी साडे अकरा वाजता घडली आहे.
धुलीवंदन झाल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता आंघोळीसाठी तलावाच्या पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला . तालुक्यातील फुटाळा येथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या सागर गहाणे (16) प्रणय गहाणे (13) असे मृतकांची नावं आहेत.
होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र रंगपंचमी साजरी होत असताना फुटाळा येथील काही मुले रंगपंचमी साजरी केल्यानंतर तलावात आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार चे थानेदार गणेश वणारे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले . पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Two youths drowned in Futala/Soundad lake near Sadak Arjuni after Holi. Sagar Gahane (16) and Pranay Gahane (13) entered the water for a bath and misjudged the depth. Duggi Par police are investigating the incident.
Web Summary : होली के बाद सड़क अर्जुनी के पास फुटला/सौंदड झील में दो युवकों की डूबने से मौत हो गई। सागर गहाने (16) और प्रणय गहाने (13) नहाने के लिए पानी में उतरे और गहराई का अंदाजा नहीं लगा पाए। डुग्गी पार पुलिस मामले की जांच कर रही है।