शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर; सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 21:06 IST

या भीषण अपघातात दोन्ही मोटारसायकलचा चुराडा झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमीला तातडीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

गोंदिया : रावणवाडी येथील हळदी फॅक्ट्रीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता घडली. महेंद्र भोजराज ठाकरे (३३, रा. चिचगाव ता. गोरेगाव) व रेखलाल नगांजी पटले (६५, रा. गोपालपूर ता. किरणापूर) व कमलेशपुरी सुरजपुरी गोस्वामी (रा. नैनपूर मंडला, मध्यप्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.गोंदिया-बालाघाट मार्गावरील रावणवाडी येथील हळदी फॅक्ट्रीजवळ एमपी ५१ एम.एच.२९५२ या मोटारसायकलला आरोपी कमलेशपुरी सुरजपुरी गोस्वामी याने हलगर्जीपणे चालवून रावणवाडीकडून अर्जुनीकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम.एच. ३५ एन ४२७४ ला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरून ट्रीपलसिट जाणारे महेंद्र ठाकरे, रेखलाल पटले व राजकुमार कटरे हे दोन्ही मोटारसायकलची समोरासमाेर धडक झाल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर झाला. या भीषण अपघातात दोन्ही मोटारसायकलचा चुराडा झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमीला तातडीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब), १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नावकर करीत आहेततेरवीच्या कार्यक्रमाला जाताना घडली घटना -अर्जुनी येथील राजेश अमृतलाल रहांगडाले (२८) यांच्या आजोबाची तेरवी असल्याने त्या तेरवीच्या कार्यक्रमाला महेंद्र भोजराज ठाकरे ( रा. चिचगाव ता. गोरेगाव) व रेखलाल नंगाजी पटले हे जात होते. कार्यक्रमाला जात असतानाच ही घटना घडल्याने ठाकरे व पटले यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल