शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

गिरी कुटुंबियांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून २ हजार रूपये रोख रकमेसह २ लाख ४७ हजाराने गंडविणाऱ्या त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी आमगावतीलच असून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल रा.बनगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्यासंदर्भात आमगाव पोलिसांनी माहिती काढली असता या गुन्ह्यात त्याचा संबध असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला ६ मे रोजी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने या प्रकरणात विनम्र उर्फ नितीश जगदीश भडके याचा सहभाग असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देपोलिसांवरही ताणली होती बंदूक : ८० ग्रॅम सोने केले जप्त, तीन महिन्यानंतर लागला छडा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या द्वारकाधाम बनगाव येथील भवन गिरी यांच्या घरी २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता बंदूक व चाकूच्या धाकावर २ लाख ४७ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेणाऱ्या दोघांना आमगाव पोलिसांनी तीन महिन्यानंतर शुक्रवारी अटक केली.गिरी कुटुंबियांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून २ हजार रूपये रोख रकमेसह २ लाख ४७ हजाराने गंडविणाऱ्या त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी आमगावतीलच असून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल रा.बनगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्यासंदर्भात आमगाव पोलिसांनी माहिती काढली असता या गुन्ह्यात त्याचा संबध असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला ६ मे रोजी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने या प्रकरणात विनम्र उर्फ नितीश जगदीश भडके याचा सहभाग असल्याचे सांगितले.पोलिसांनी भडके संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मोहम्मदने तो कुठे राहतो याची माहिती दिली नाही. परंतु पोलिसांनी त्याची माहिती काढली असता तो देवरी येथे राहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी देवरी येथील पंचशील चौक गाठून भडके याला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांवरच देशी कट्टा ताणून धरला. परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा कट्टा बाजूला सारत त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सोबत त्याने चोरी केलेले ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे त्याच्याजवळ मिळाले. त्या दोघांवर आमगाव पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,२७ भादंविच्या कलम १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकूल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्यामराव काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस हवालदार रामेश्वर बर्वे,आनंद भांडारकर, युवराज सव्वालाखे, खुशाल पेंदाम, अरूण उके, अंसार कुरेशी, सुरेंद्र लांजेवार, सायबर सेलचे दीक्षीत,दमाहे यांनी केली.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस