लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या द्वारकाधाम बनगाव येथील भवन गिरी यांच्या घरी २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता बंदूक व चाकूच्या धाकावर २ लाख ४७ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेणाऱ्या दोघांना आमगाव पोलिसांनी तीन महिन्यानंतर शुक्रवारी अटक केली.गिरी कुटुंबियांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून २ हजार रूपये रोख रकमेसह २ लाख ४७ हजाराने गंडविणाऱ्या त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी आमगावतीलच असून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल रा.बनगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्यासंदर्भात आमगाव पोलिसांनी माहिती काढली असता या गुन्ह्यात त्याचा संबध असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला ६ मे रोजी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने या प्रकरणात विनम्र उर्फ नितीश जगदीश भडके याचा सहभाग असल्याचे सांगितले.पोलिसांनी भडके संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मोहम्मदने तो कुठे राहतो याची माहिती दिली नाही. परंतु पोलिसांनी त्याची माहिती काढली असता तो देवरी येथे राहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी देवरी येथील पंचशील चौक गाठून भडके याला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांवरच देशी कट्टा ताणून धरला. परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा कट्टा बाजूला सारत त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सोबत त्याने चोरी केलेले ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे त्याच्याजवळ मिळाले. त्या दोघांवर आमगाव पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,२७ भादंविच्या कलम १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकूल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्यामराव काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस हवालदार रामेश्वर बर्वे,आनंद भांडारकर, युवराज सव्वालाखे, खुशाल पेंदाम, अरूण उके, अंसार कुरेशी, सुरेंद्र लांजेवार, सायबर सेलचे दीक्षीत,दमाहे यांनी केली.
बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST
गिरी कुटुंबियांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून २ हजार रूपये रोख रकमेसह २ लाख ४७ हजाराने गंडविणाऱ्या त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी आमगावतीलच असून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल रा.बनगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्यासंदर्भात आमगाव पोलिसांनी माहिती काढली असता या गुन्ह्यात त्याचा संबध असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला ६ मे रोजी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने या प्रकरणात विनम्र उर्फ नितीश जगदीश भडके याचा सहभाग असल्याचे सांगितले.
बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना अटक
ठळक मुद्देपोलिसांवरही ताणली होती बंदूक : ८० ग्रॅम सोने केले जप्त, तीन महिन्यानंतर लागला छडा