नवीन रुग्णांपेक्षा मात करणारे दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:24 AM2021-01-14T04:24:48+5:302021-01-14T04:24:48+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यावर असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांच्या ...

Twice as many as new patients | नवीन रुग्णांपेक्षा मात करणारे दुप्पट

नवीन रुग्णांपेक्षा मात करणारे दुप्पट

Next

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यावर असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतसुद्धा सातत्याने घट होत आहे. बुधवारी (दि.१३) जिल्ह्यात ११ नवीन रुग्णांची नोंद झाली तर, २२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे नवीन रुग्णांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे.

कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने राबविलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम फारच प्रभावी ठरली. त्यानंतर लोकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाला पायबंद लावण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बुधवारी (दि.१३) आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक सहा रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. आमगाव दोन, सालेकसा एक व देवरी तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ५९,६६० जणांच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८ १४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात असून, ६२,२८४ नमुन्याची तपासणी करण्यात आली. यापैकी ५६,२६५ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १३,९६१ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १३,५३३ जणांनी काेरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २४८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ५० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

Web Title: Twice as many as new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.