शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

व्यसनमुक्त गोंदियासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: January 23, 2016 00:27 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यसनमुक्त समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी हे शासन सातत्याने प्रयत्नशील असून ....

पालकमंत्र्यांची ग्वाही : चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला थाटात सुरूवातगोंदिया : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यसनमुक्त समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी हे शासन सातत्याने प्रयत्नशील असून व्यसनमुक्ती साहित्य संमेलन ही अभिनव संकल्पना यातूनच निर्माण झाली. गोंदिया जिल्ह्यात होणाऱ्या या व्यसनमुक्त साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जिल्हा व्यसनमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. येथील स्वागत लॉनच्या प्रांगणात दि.२२ व २३ जानेवारी असे दोन दिवस हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मंचावर संमेलनाध्यक्ष मुक्ताताई पुणतांबेकर, प्रसिध्द गायक, संगीतकार व चित्रपट निर्माता अवधूत गुप्ते, सिनेअभिनेत्री निशा परूळेकर यांची विशेष उपस्थिती तर जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, समाजकल्याण विभागाचे आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, गोंदियाच्या नगराध्यक्ष कशिश जायसवाल, माजी आ.हेमंत पटले, स्वागताध्यक्ष जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, सीईओ दिलीप गावडे, पालकमंत्र्यांच्या सौभाग्यवती शारदाताई बडोले आदींची मंचावर उपस्थिती होती.यावेळी ना.बडोले म्हणाले, मुक्तांगणच्या माध्यमातून डॉ.अनिल अवचट, अनिता अवचट आणि मुक्ताताई पुणतांबेकर यांचे व्यसनमुक्तीचे कार्य शब्दांपलिकडचे आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणारे, राज्यात व्यसनमुक्तीचा प्रचार-प्रसार करणारे, प्रशासनाची जबाबदारी, ग्रामस्तरावरील समित्या, दारु प्राशनाविषयीचे धोरण, व्यसनमुक्त समित्या, व्यक्ती, संस्था आदी व्यसनमुक्त समाजासाठी काम करणाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आयुष्याचा काडीकचरा झाला दोस्त यार हो..,या नशेने जीवनाचा नाश झाला यार हो..,ही स्वरचित कविता ऐकवून बडोले यांनी समाजाला व्यसनमुक्त होण्याचे आवाहन केले. यावेळी संमेलनाध्यक्ष पुणतांबेकर पुढे म्हणाल्या, विदर्भातील तीन जिल्ह्यात दारूबंदी आहे. व्यसनमुक्तीचा संकल्प करु न भविष्यात गोंदियातसुध्दा दारु बंदी झाली पाहिजे. व्यसनाधिनता हा मोठा सामाजिक प्रश्न बनला आहे. या प्रश्नामुळे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहे. एड्स व कॅन्सरनंतर तिसऱ्या क्र मांकाचा मोठा आजार व्यसनाधिनता हा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमुद केले असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी या संमेलनामुळे जिल्हयात व्यसनमुक्तीचे काम प्रभावीपणे पुढे जाईल अशी आशा व्यक्त केली. सिनेअभिनेत्री निशा परूळेकर म्हणाल्या, प्रत्येक व्यक्ती तणावात असतो. मात्र प्रत्येकजण व्यसनाधीन होत नाही. आयुष्य अतिशय सुंदर आहे. त्याला व्यसनाची लागण करुन त्याची राखरांगोळी करु नका. मोठी स्वप्न पहा आणि आनंदी आयुष्य जगा असा संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, स्वागताध्यक्ष रचना गहाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यसनमुक्तीचे राज्याचे दूत सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव काही कारणांमुळे उपस्थित न राहिल्यामुळे त्यांचे मनोगत उपस्थितांना ऐकविण्यात आले. ज्येष्ठ सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचेही मनोगत ऐकविण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्यसनमुक्ती साहित्य संमेलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार या विषयावरील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्तविकातून प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनी संमेलनामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर व विवेक अलोणी यांनी तर आभार अमोल मडामे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)