शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

आदिवासीचे श्रद्धास्थान कचारगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:20 AM

देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपºयातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात.

ठळक मुद्देयात्रेत गोंडी संस्कृतीचे दर्शन : माघ पौर्णिमेला देशभरातील आदिवासींचे आगमन

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात. दरम्यान लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आदिवासींची मोठी यात्रा भरते. या यात्रेला कचारगड यात्रा म्हणून ओळखले जाते. कचारगडप्रती सर्व आदिवासी समाजाची श्रद्धा व आस्था पाहून या स्थळाला आदिवासींचे ‘मक्का मदिना’ समजू लागले आहेत. तर आदिवासी समाजातील लोक याला आपली ‘दीक्षाभूमी’ मानतात.कचारगड हे पवित्र धार्मिक व नैसर्गिक स्थळ जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर आहे. तर गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर आहे. हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले नैसर्गिक पर्यटन स्थळसुद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणाला भेट देणाºया आदिवासी भाविकांसोबतच गैरआदिवासी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. यात्रेदरम्यान येथे चारपाच लाख भाविक व पर्यटक दरवर्षी येतात. शिवाय वर्षभर येथे भाविक व पर्यटक येतात. कचारगडला जाण्यासाठी रेल्वे मार्ग आणि बस मार्ग दोन्ही सोयीस्कर असून दरेकसा रेल्वे स्टेशनवरुन ५ किमी पायी चालत कचारगड गुफेपर्यंत पोहचावे लागते. तर बस मार्गाने गेल्यास गोंदिया-डोंगरगड मार्गावर धनेगाव येथे उतरुन ४ किमी पायी चालावे लागते. कचारगडला पोहचत असताना हिरवीगार वनराई, घनदाट जंगलाने व्यापलेली मोठमोठी पर्वत रांगा बघायला मिळते. याच पर्वत रांगेच्या एका मोठ्या पहाडात मोठी विशालकाय गुफा असून ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा मानली जाते. त्याचबरोबर लगतच्या पहाडात लहानमोठ्या गुफा असून या गुफांमध्ये आदिवासींचे आद्य दैवत शंभूसेक आणि मॉ काली कंकालीचे वास्तव्य आहे.आदिवासी गोंड धर्मगुरु, जाणकार या स्थळाबद्दल व कचारगड नाव पडल्याबद्दल आपापले मत मांडत असतानाच सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, कचारगडला तीन हजार वर्षांपूर्वी गोंडी आदिवासीचा उगम झाला. त्यांची मोठी मर्मस्पर्शी कथा आहे. असे बोलल्या जाते की, माता गौराचे ३३ मानलेले पूत्र होते. ते पूत्र मोठे उपद्रवी होते. त्यामुळे रागाने शंभूसेक यांनी त्यांना कचारगडच्या गुफेत डांबून ठेवले व दारावर मोठा दगड लावून ठेवला. या प्रकारामुळे मॉ कलीकंकाली द्रवित झाली. त्यावेळी किंदरी वादक संगीतज्ज्ञ हिरासुका पाटारी यांनी आपल्या संगीताच्या शक्तीने त्या युवकांमध्ये उर्जा निर्माण केली. तेव्हा त्या ३३ युवकांनी एका ताकदीने दगडाला धक्का दिला व बाहेर पडले. मात्र यात संगीतज्ज्ञ दिशसुका पाटारी यांचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला. ते सर्व ३३ पूत्र त्या ठिकाणातून पसार झाले व पुढे जाऊन देश-प्रदेशात त्यांचे वंशज वाढले.कालांतराने गोंडीयन संस्कृतीचे रचनाकार पारी कुपार लिंगो यांनी त्या सगळ्या वंशजांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. यात ३३ कोट संगोपन, १२ पेन यांचे ७५० गोत्र या सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याला गोंडी भाषेत ‘कच्चा’ असे म्हटले जाते. म्हणून या स्थळाला कचारगड नाव देण्यात आले.एकीकडे धार्मिक मान्यता व श्रद्धा असली तरी कचारगड गुफेला भेट दिल्यावर वैज्ञानिक दृष्टीकोणातून निरीक्षण केल्यास या पर्वतरांगेत मोठ्या पहाडात कच्चे दगड असल्याने त्यांचे स्खलन होऊन पहाडात गुफा तयार झाली असावी. तसेच या गुफेत निरीक्षण केल्यास तेथे लोह व इतर खनिजांचे कच्चे अवशेष पहायला मिळतात. म्हणून या ठिकाणाचे नाव कचारगड झाले, असे बोलले जाते.हजारो वर्षांपासून प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिलेला कचारगड शेवटी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक व इतिहासकार यांच्या नजरेस आला. त्यांनी या स्थळाचा शोध घेवून अभ्यास केला व हेच आदिवासींचे उगमस्थान आहे, या निकर्षावर पोहोचले.आजपासून ३४ वर्षांपूर्वी गोंडी धर्माचार्य स्व. मोतीरावण कंगाली, संशोधक के.बा. मरस्कोल्हे, गोंड राजे वासुदेव शहा टेकाम, दादा मरकाम, सुन्हेरसिंह ताराम यासारखे लोक कचारगडला आले. त्यांनी या स्थळाची ओळख आदिवासी समाजाला करुन दिली. त्यानंतर सतत या स्थळाची ओळख वाढत गेली.सन १९८४ ला माघ पौर्णिमेला धनेगावच्या प्रांगणात गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज फडकावून कचारगड यात्रेला १३ लोकांनी सुरुवात केली. आज कचारगड यात्रेला मोठे व्यापक स्वरुप आले असून दरवर्षी माघ पौर्णिमेला चार ते पाच लाख भाविक प्राकृतिक महापूजेला उपस्थिती लावतात.