शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांनी कायम ठेवला मतदानावरील बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:51 IST

८५ वर्षांवरील व दिव्यांग मतदारांनी मतदान नाकारले : इतर ७४ मतदारांनी केले मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील वयोवृद्ध मतदार व दिव्यांग मतदारांचा शनिवारी (दि.९) गृह मतदान घेण्यात आले. यात मतदारसंघातील आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदान अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले. तर २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत आदिवासी गोंड गोवारी समाज पूर्णतः मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे बोलल्या जाते.

८५ वर्षांवरील वयोवृध्द मतदार तसेच दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सहज शक्य होण्यासाठी निवडणूक विभागाने गृह मतदानाची व्यवस्था केली होती. मतदान करण्यासाठी त्यांचेकडून पूर्वीच अर्ज मागवून नाव नोंदणी करण्यात आली. 

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील वयोवृद्ध ७० मतदार व दिव्यांग १० मतदार असे ८० मतदारांनी घरूनच मतदान करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यानुसार शनिवारी ८० मतदारांचे गृह मतदान घेण्यासाठी दहा निवडणूक पथकांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली होती. विधानसभा क्षेत्रात गृह मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. नोंदणी केलेल्या ८५ वर्षांवरील ६६ मतदार व दिव्यांग ८ मतदार असे एकूण ७४ मतदारांनी भरूनच मतदान करून मतदानाचा हक्क बजावला. 

५ मतदारांचा बहिष्कारराज्यातील आदिवासी गोंड गोवारी समाज संघटनेने विधानसभा निवडणु- कीवर बहिष्कार यांची घोषणा यापूर्वीच केली होती. समाजाच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदान करणार नाही अशी घोषणा केली होती. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ४ मतदार तसेच दिव्यांग म्हणून एक मतदार असे आदिवासी गोंड गोवारी समाजातील ५ मतदारांनी मतदान करण्यास स्पष्ट नकार देऊन मतदा- नावरील बहिष्कार कायम ठेवला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदिया