शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हॅल्सने घेतला अचानक पेट, जीवित हानी टळली; सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड-फुटाळाजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 02:50 IST

प्राप्त माहितीनुसार एका खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी ०४, एनए ७७७६ ही मंगळवारी रात्री रायपूरहून नागपूरकडे प्रवासी वाहून नेत होती.

गोंदिया : रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने ट्रॅव्हल्स जळाल्याची घटना नागपूर- रायपूर मार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी (दि.२२) रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.प्राप्त माहितीनुसार एका खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी ०४, एनए ७७७६ ही मंगळवारी रात्री रायपूरहून नागपूरकडे प्रवासी वाहून नेत होती. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड रेल्वे क्रॉन्सिंगजवळ ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ट्रॅव्हल्स थांबविली, तसेच ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. यानंतर काही क्षणांत ट्रॅव्हल्सची आग वाढली. सौंदड येथील नागरिकांनी ट्रॅव्हल्सकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, तसेच या घटनेची माहिती सडक अर्जुनी येथील व हायवे अग्निनशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे वाहन काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशनम वाहनाच्या मदतीने ट्रॅव्हल्सला लागलेली आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी घेतली आहे.ट्रॅव्हल्समध्ये होते ३५ ते ४० प्रवासी - रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० प्रवास करीत होते. ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यानंतर चालकाने ट्रॅव्हल्स थांबवून प्रवाशांना वेळीच बाहेर काढले. त्यामुळे सर्वच प्रवासी सुरक्षित असून, मोठी दुर्घटना टळली.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल