परिवहन मंडळ भंडारा विभाग अधिकाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:32+5:302021-01-15T04:24:32+5:30

देवरी : राज्य परिवहन महामंडळाचा कारभार मराठीतूनच करण्याची सक्ती असतानाही तीन ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केल्याप्रकरणी राज्य परिवहन भंडारा ...

Transport Board hit Bhandara department officials | परिवहन मंडळ भंडारा विभाग अधिकाऱ्यांना दणका

परिवहन मंडळ भंडारा विभाग अधिकाऱ्यांना दणका

Next

देवरी : राज्य परिवहन महामंडळाचा कारभार मराठीतूनच करण्याची सक्ती असतानाही तीन ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केल्याप्रकरणी राज्य परिवहन भंडारा विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडस्कर यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्यांना त्याप्रकरणी ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मराठी भाषेला चालना देण्यासाठी एसटीचा व्यवहार मराठीतूनच करण्याची सक्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे. असे असतानाही भंडारा विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी वडस्कर यांनी तीन ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला. यावर मराठी भाषा दक्षता अधिकारी यांनी २० ऑक्टोबर २०२० पत्र काढून विभा लेखा अधिकाऱ्यांना वडस्कर यांच्या वेतनातून ३०० रुपये वसूल करण्याचे, तसेच या दंडाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेत करण्याकरिता सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, गडचिरोली विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांनी तीन पत्रांवर इंग्रजीत स्वाक्षरी केल्याने त्यांनाही प्रत्येक स्वाक्षरीसाठी १०० रुपये याप्रमाणे तीन स्वाक्षरींसाठी ३०० रुपयांचा दंड गडचिरोली विभागीय मराठी दक्षता अधिकाऱ्यांनी ठोठावल्याची माहिती आहे.

Web Title: Transport Board hit Bhandara department officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.