शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

हड्डीटोली येथे मालधक्का स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 20:48 IST

शहरातील रेलटोली येथील मालधक्का हड्डीटोली येथे स्थांनातरीत करा, रेल्वे स्थानकावरील समस्या मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दक्षिण पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सोईन यांना दिलेल्या निवेदनातून केली.

ठळक मुद्देमहाव्यवस्थापक सोईन यांना निवेदन : समस्या मार्गी लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील रेलटोली येथील मालधक्का हड्डीटोली येथे स्थांनातरीत करा, रेल्वे स्थानकावरील समस्या मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दक्षिण पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सोईन यांना दिलेल्या निवेदनातून केली. रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांवर चर्चा केली.महाव्यवस्थापक सोईन यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या ऐकूण घेऊन त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. रेलटोली येथील मालधक्का वाढत्या शहरीकरणामुळे आता शहराच्या मध्यभागी आला आहे. रहिवासी क्षेत्रात अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.गुड्स शेडला गोंदिया शहरातीलच हड्डीटोली येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे आधीपासूनच विचाराधिन आहे. आता प्रस्तावित हड्डीटोली गुड्स शेडपर्यंत पोहोचण्यासाठी बायपास मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी गुड्सशेड स्थलांतरित झाले तर अवजड वाहने शहराच्या बाहेर बायपास मार्गावरून निघू शकतील व नागरिकांना सुविधा होईल. असे अपूर्व अग्रवाल यांनी सोईन यांना सांगितले. निवेदनातून गोंदिया शहरात कटंगी लाईनवर राणी सती लॉज समोरून रेल्वे आरक्षण कार्यालयापर्यंत पादचारी पुलाच्या बांधकामाची मागणी करण्यात आली. अंडरग्राऊंडजवळ रेल्वेच्या जमिनीवर वसलेल्या सतनामी मोहल्ल्याबाबत सांगण्यात आले की, ही जमीन रेल्वे विभागासाठी उपयोगाची नाही.या जमिनीवर समाजाचा मागील अनेक दशकांपासून ताबा आहे. अतिक्रमणाला नियमित करण्यासाठी संबंधित जमीन राज्य शासनाला हस्तांतरित करण्याची मागणी केली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अंडरग्राऊंड मार्गावर लाईट, पेंटिंग व दुरूस्तीबाबत मागणी केली. रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूकडे वसलेल्या शहरास आपसात जोडण्यासाठी रेल्वे विभागाद्वारे अंडरग्राऊंड मार्गाचे बांधकाम अनेक दशकांपूर्वी करण्यात आले होते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल व घाण असते.स्ट्रीट लाईटच्या अभावाने कधीकधी गुन्हेगारीच्या घटनाही घडतात. त्यामुळे सदर मार्ग अनुपयोगी ठरत आहे. शिष्टमंडळात काँग्रेस महासचिव व गोंदिया स्थानक सल्लागार समितीचे सदस्य अपूर्व अग्रवाल, मंडल रेल्वे व्यवस्थापक अमित अग्रवाल, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल, रेल्वे समितीचे माजी सदस्य रमन मेठी, नगरसेवक व्यंकट पाथरू, सुनील तिवारी, सुशील रहांगडाले, कमल छपरिया, मनोज पटनायक, राजू लिमये, दिलीप गुप्ता, बलजीतसिंह बग्गा, गिरीश तांडेकर, ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, आरपीएफ निरीक्षक भोलानाथसिंह, जीआरपी निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व सदस्य उपस्थित होते.