शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रेल्वे अनारक्षित तिकीट स्मार्ट फोनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 9:41 PM

बरेचदा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यापासून प्रवाशांना वंचित राहावे लागते. तर मोठ्या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडक्यांसमोर लागलेल्या रांगामुळे त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकावर जाण्याची समस्या दूर : जीपीएस प्रणालीची चाचणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बरेचदा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यापासून प्रवाशांना वंचित राहावे लागते. तर मोठ्या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडक्यांसमोर लागलेल्या रांगामुळे त्रास सहन करावा लागतो. ही समस्या कायम स्वरुपी दूर होणार असून प्रवाशांना त्यांच्या स्मार्ट फोनवरुन अनारक्षीत तिकीट काढता येणार आहे. ही सुुविधा रेल्वेतर्फे लवकरच सुरू केली जाणार आहे.पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने रेल्वे तिकीटावर सर्व रेल्वे स्थानकांची नावे मराठीत छापण्याचा निर्णय घेत १ मे पासून त्याची अंमलबजावणी केली. त्यानंतर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी अनारक्षीत तिकीट स्मार्ट फोनवरुन काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. स्मार्ट फोनवर अनारक्षीत तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने चाचणी सुरू केली.यासाठी जीपीएस प्रणालीची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून जीपीएस प्रणाली योग्य काम करीत आहे किंवा याची चाचणी घेतली जात आहे.गोंदिया रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जीपीएस प्रणालीव्दारे अनारक्षीत तिकीट स्मार्ट फोनवर उपलब्ध करुन देण्यासाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले. त्यामुळेच ही सुविधा प्रवाशांना त्यांच्या स्मार्ट फोनवर उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे एखाद्याला रेल्वे स्टेशनवर पोहचण्यास उशीर झाला तरी जवळील स्मार्ट फोनवरुन अनारक्षीत तिकीट काढूृन प्रवास करता येणार आहे. यासाठी रेल्वे स्थानकापासून तुम्ही २५ मीटर दूर असणे आवश्यक आहे. रेल्वे स्थानकावर पोहचल्यानंतर प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.स्मार्ट फोनवरुन अनारक्षित तिकीट काढल्यानंतर रेल्वे प्रवास दरम्यान टीटीला स्मार्ट फोनवरुन काढलेले तिकीट दाखविता येणार आहे.यामुळे बरेचदा वेळेवर रेल्वे स्थानकावर रांगेत लागून तिकीट काढण्याच्या समस्येपासून प्रवाशांना सुटका मिळणार आहे. तसेच घरी बसून ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्या गाडीचे शेड्युल पाहुन तिकीट बुक करता येणार आहे.असे काढता येणार अनारक्षित तिकीटजर तुम्हाला एखाद्या ठिकाणी रेल्वे प्रवास करण्यासाठी अनारक्षीत तिकीट काढायचे असेल तर तुमच्याजवळ स्मार्ट फोन व तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्जची रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यातूनच तिकीटाची रक्कम कपात केली जाणार आहे. मोबाईल क्रमांकासह तुमच्या बँकेचे खाते क्रमांक सुध्दा द्यावे लागणार आहे.युटीएस अ‍ॅपद्वारे मिळेल सुविधास्मार्ट फोनच्या माध्यमातून अनारक्षीत रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने एक युटीएस(अनारक्षीत तिकीट प्रणाली) अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वे विभागाकडे युटीएस प्रणाली सुरुवातीपासूनच उपलब्ध आहे.मात्र त्याला जीपीएस प्रणालीशी सलग्न करण्याचे काम सुरू आहे. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट फोनवर तिकीट काढणे सुलभ होणार आहे.अ‍ॅपमुळे प्रवास होतोय सुकररेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध अ‍ॅप तयार केले आहेत. कोणत्या रेल्वे स्थानकावर कोणत्या गाड्या जातात, गाडीची नेमकी पोजीशन, रेल्वे स्थानकावर पोहचण्याची वेळ यासंबंधीची माहिती रेल्वेच्या वेअर ईज माय ट्रेन सारख्या अ‍ॅपमुळे शक्य होत आहे. या अ‍ॅपमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होत असल्याचे चित्र आहे.बिलासपूर येथे मंथनस्मार्ट फोनवर अनारक्षीत तिकीट काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातंर्गत येणाºया सर्व रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य व्यवस्थापकांची बैठक १४ मे ला बिलासपूर येथे आयोजित केली आहे. या बैठकीत या सुविधेविषयी मंथन होणार असून त्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे