शहरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:12 AM2018-08-15T01:12:36+5:302018-08-15T01:13:06+5:30

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यासाठी मंगळवारी (दि.१४) हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.

Traffic in the city | शहरात वाहतुकीची कोंडी

शहरात वाहतुकीची कोंडी

Next
ठळक मुद्देजुना उड्डाणपूल बंद केल्याचा फटका : नवीन पुलावर अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यासाठी मंगळवारी (दि.१४) हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. तर नवीन उड्डाणपुलावरुन जड वाहतुकीला बंदी असताना सुध्दा जडवाहने पुलावरुन सुसाट धावत होते. त्यामुळे या पुलावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
शहरातील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने दोनदा जिल्हा प्रशासनाने दिले. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलीत यावर उपाय योजना करण्यास सुरूवात केली. जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद केल्यास त्याला पर्यायी सुविधा काय, अथवा या पुलावरुन हलकी वाहने जाऊ द्यायची याबाबत सार्वजनिक बांधकाम, वाहतूक नियंत्रण आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या उड्डाणपुलावरुन हलकी वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले.
जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहने जावू नये, यासाठी हाईट बॅरियर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मंगळवारी (दि.१४) दिवसभर हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पुलाची काही ठिकाणी दुरूस्ती सुध्दा करण्यात आली. मात्र जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने त्याचा फटका शहरवासीयांना बसला.
वाहन चालकांना नवीन उड्डाणपुलावरुन वळसा घेवून जयस्तंभ चौक, नेहरु चौकाकडे जावे लागले. त्यामुळे नेहरुचौक व जयस्तंभ चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. त्यातच नगर परिषदेतर्फे शहरातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने काही मार्ग बंद आहे.
यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडली. दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.
नवीन पूल नावापुरताच
जुन्या उड्डाणपुलाला पर्याय म्हणून दोन वर्षांपूर्वी गोंदिया बालाघाट मार्गावर ५४ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र या पुलाचे बांधकाम करताना तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने ५४ कोटी रुपयांचा हा पूल शहरवासीयांसाठी नावापुरताच ठरत आहे. नवीन उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पुलासाठी जागा सोडण्यात आली नाही. तर पुलाचा उतार देखील चुकीचा आहे. त्यामुळे या पुलावरुन जडवाहतुक सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवीन पुलाचा प्रस्ताव
जुना जीर्ण तर नवीन उड्डाणपूल सदोष असल्याने गोंदिया बालाघाट मार्गावर नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्याची चाचपणी सध्या सुरू असल्याची माहिती आहे.
नियमांना डावलून जडवाहतूक सुरू
नवीन उड्डाणपुलावरुन एसटी बसेस, ट्रक, स्कूल बसेस व जडवाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली. पुलाच्या सदोष बांधकामामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या पुलावरुन जड वाहतुक सुरू ठेवू नये, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र मंगळवारी या पुुलावरुन जडवाहतुक सर्रारपणे सुरू होती. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी सुध्दा डोळे बंद करुन पाहत होते.

Web Title: Traffic in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.