पुजारीटोला धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:00 AM2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:34+5:30

कोरोनामुळे यंदा मागील पाच महिन्यांपासून सर्वच पर्यटन स्थळी शुकशुकाट आहे. तरी नागरिकांना सुध्दा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यंदा जून, जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने हाजराफॉल, नवेगावबांध, पुजारीटोला, सिरपूरबांध या पर्यटनस्थळ परिसरात शुकशुकाट होता.

Tourist crowd in Pujaritola dam area | पुजारीटोला धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

पुजारीटोला धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देनियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष : सुरक्षा विषयक उपाययोजनांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : जिल्ह्यात मागील तीन चार दिवस झालेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले, सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरण देखील भरले असून या धरणाचे ६ दरवाजे सोमवारी (दि.२४) उघडण्यात आले. त्यामुळे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी धरणाच्या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी होत आहे. मात्र त्यांच्याकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने या ठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनामुळे यंदा मागील पाच महिन्यांपासून सर्वच पर्यटन स्थळी शुकशुकाट आहे. तरी नागरिकांना सुध्दा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यंदा जून, जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने हाजराफॉल, नवेगावबांध, पुजारीटोला, सिरपूरबांध या पर्यटनस्थळ परिसरात शुकशुकाट होता. मात्र जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे हाजराफॉल व पुजारीटोला परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.सध्या कोरोनाचा संक्रमण सुरू असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगण्याची गरज आहे. पण पर्यटकांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदी गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. पर्यटक बिनधास्तपणे धरणातील पाण्यात जावून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण संबंधित विभागाचे सुध्दा या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे.

धरण स्थळी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
पुजारीटोला येथील धरणस्थळी मागील दोन तीन दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्यटक नियमांचे पालन न करता धरणातील पाण्यात जावून जीव धोक्यात घालून सेल्फी घेत आहे. मात्र येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त व सुरक्षा रक्षकांची सुध्दा नियुक्ती सिंचन विभागाने केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडल्यास या जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सेल्फी घेणे बेतू शकते जीवावर
पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहेत. तर काही अतिउत्साही पर्यटकांना आपला मोह आवरत नसून ते धरणाच्या पाण्यात जावून सेल्फी घेत आहेत.त्यामुळे हा प्रकार धोकादायक असून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 

Web Title: Tourist crowd in Pujaritola dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.