शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

आधी भाव नसल्याने टोमॅटो फेकले; आता ५० रुपयांवर गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

रक्त जाळून घेतलेले पीक फेकून देताना शेतकरी चांगलाच हळहळला होता. मात्र आता तोच टोमॅटो त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा ठरत आहे. कधी रस्त्यावर टाकला गेलेला टोमॅटो आता ६०-८० रुपये दराने विकला जात आहे. सध्या देशात महागाई सत्र सुरू असून सर्वच वस्तूंचे दर वधारले आहे. त्यात आता जेवणात हमखास वापर होणारा टोमॅटो चढल्याने ते वापरताना जरा जपून असा धसकाच गृहिणींनी घेतला आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  साधारण दोन महिन्यांपूर्वी चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला होता. उत्पादन घेतल्यानंतर परवडणारा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागले होते. रक्त जाळून घेतलेले पीक फेकून देताना शेतकरी चांगलाच हळहळला होता. मात्र आता तोच टोमॅटो त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा ठरत आहे. कधी रस्त्यावर टाकला गेलेला टोमॅटो आता ६०-८० रुपये दराने विकला जात आहे. सध्या देशात महागाई सत्र सुरू असून सर्वच वस्तूंचे दर वधारले आहे. त्यात आता जेवणात हमखास वापर होणारा टोमॅटो चढल्याने ते वापरताना जरा जपून असा धसकाच गृहिणींनी घेतला आहे. रोजच्या जेवणातील वापर असो की, कोशिंबिरीतील वापर मात्र टोमॅटो चढल्याने आता त्याचा वापर डोळ्यात पाणी आणणारा ठरत आहे. भाजीपाला महागल्याने टोमॅटोची चटणीच करता येत होती. मात्र आता एवढा महाग टोमॅटो खरेदी करताना विचार करावा लागत असून चटणीही हिरावली आहे. 

येथून येतो टोमॅटो - गोंदिया जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन होत नसल्याने परराज्य व जिल्ह्यातून जिल्ह्यात टोमॅटोची आवक होत आहे. - जिल्ह्यात सध्या जयपूर, नाशिक बँगलोर येथून टोमॅटो येत असून तोही हलक्या दर्जाचा येते, अशी माहिती आहे. - स्थानिक शेतकरी भाजीपाला अन्य पीक घेत असल्याने व टोमॅटोला पोषक वातावरण येथे नसल्याने टोमॅटो शेती करता येत नाही. मागणी वाढली आवक घटली - एकतर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन होत नसून परराज्य व जिल्ह्यातून टोमॅटो आणला जातो. त्यातही हलक्या दर्जाचा माल येत असल्याने असून परतीच्या पावसाने पिकांचे चांगलेच नुकसान केले आहे. त्यात आता मागणी वाढली असून आवक घडल्याने टोमॅटोचे दर चांगलेच चढले आहे. 

एवढा महाग टोमॅटो  कसा परवडेल? किराणा समान व भाजीपाला चांगलाच महागला आहे. त्यात आता दररोजच्या वापरातील टोमॅटोही वधारल्याने एवढा महाग टोमॅटो खरेदी करताना विचारच पडतो. दररोज आता जेवणात एवढा महागडा टोमॅटो वापरणे सर्वसामान्यांना कसे परवडेल. - नेहा निनावेमहागडा भाजीपाला खरेदी न करता कधी-कधी टोमॅटोच्या चटणीची जोड देता येते. मात्र आता टोमॅटोच डोळे दाखवू लागला आहे. अशात दररोजच्या स्वयंपाकात टोमॅटो टाकणेच कठीण झाले आहे. टोमॅटो खरेदी करताना विचारच पडतो. - चित्रा लिल्हारे

 

टॅग्स :vegetableभाज्या