शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आजची नवरी लाजत नाही, कधी बुलेटवरून, तर कधी नाचत लग्नाला येते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 17:26 IST

लग्न पद्धतीच्या पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज : डिजीटल पत्रिकेचेही फॅड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन मानवी जीवनातही आमूलाग्र बदल झाले आहेत. दैनंदिन गरजांपासून ते अगदी लग्न सोहळ्यापर्यंत आधुनिकता आली आहे. आधुनिकतेच्या या दुनियेत लग्न पद्धतीतही बदल होत गेले आणि पूर्वी रडत, लाजत, डोक्यावर पदर घेऊन, खाली मान घालून लग्नाला येणारी नवरी मुलगी आता चक्क स्वतःच्याच लग्नात नाचत येण्याची 'फॅशन' आली आहे.

लग्न म्हणजे दोन कुटुंबांना एकत्र आणणारा सोहळा. मात्र, या सोहळ्यालाही आता 'ग्लॅमर' आले आहे. पूर्वी वधू किंवा वराकडील मंडळींना जास्त खर्च नको असे म्हणून थोडक्यात लग्न करण्याची परंपरा होती. दारातच मंडप घालून अंगणात जेवणाच्या पंगती वाढण्यात यजमानांना वेगळाच आनंद वाटत होता. मात्र, अलीकडे लग्नावर लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. लग्न ठरल्यानंतर आई-वडिलांचे घर सोडून दुसऱ्या घरी आपण जाणार याचे दुःख तिच्या मनात सलत असते. त्यामुळे लग्नसोहळा आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा असला तरी मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद, काळजी आणि दुःखात विरलेला असतो. त्यामुळे लग्नाला येताना मुलगी लाजत, मान खाली घालूनच यायची. मात्र, अलीकडे त्यातही 'ग्लॅमर' आले असून, लाजत येणारी नवरी मुलगी चक्क वन्हाडी मंडळींमधून नाचत येण्याची 'फॅशन' वाढली आहे. यामध्ये वन्हाडी मंडळीही सहभागी होतात.

कधी बुलेट, तर कधी डोलीतून आगमन■ घरची मंडळी नाचत - नाचत नवरी मुलीला लग्न मंडपात आणतात, तर कधी स्वतः मुलगीच बुलेटवरून लग्नासाठी येथे येते. यातील काही तर डोलीतून नवरीला आणतात.

मेंदी, हळदीत रंगअलीकडे लग्नातील मेहंदी व हळदी समारंभाचे स्वरूप बदलले आहे. हजारो रुपये खर्च करून विशेष सजावट केली जाते. त्या दिवशी हिरवे- पिवळे कपडे (ड्रेस कोड) घालण्याची पद्धत रुढ झाली आहे.

कोरिओग्राफरला मागणीलग्नात संगीतासाठी एक दिवस आरक्षित असतो. त्यासाठी गाणी सिलेक्ट करून त्यावर नाच फिक्स असतात. यासाठी आता खास कोरिओग्राफर बुक केले जात असून, त्यांच्याकडून त्या त्या गाण्यांवर नाच शिकला जातो.

डीजेची 'फॅशन'वरातीसाठी बेंजो, ढोल-ता- शांपेक्षा डीजेला पसंती दिली जात आहे. केवळ वरातीलाच नाही तर हळदी, मेंदीलाही डीजेच लागतो. आपल्या पसंतीच्या गाण्यांवर नाचत गात जल्लोष केला जातो. 

टॅग्स :marriageलग्नgondiya-acगोंदिया