शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

महिलांच्या तोंडातही तंबाखू अन् गुटखा ! महिलांमध्ये वाढतेय तंबाखूचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:34 IST

Gondia : तब्बल १५३९ महिलांचे केले समुपदेशन

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजघडीला बहुतांश व्यक्तींच्या तोंडात तंबाखू-गुटख्याचा बार भरलेला दिसतो. यामध्ये तरुण, युवा व वृद्धच काय तर १४ वर्षांच्या आत अल्पवयीनांचाही समावेश आहे. मात्र व्यनसाचा हा चस्का फक्त पुरुषांपुरताच मर्यादित नसून महिला सुद्धा यापासून काही दूर नाहीत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत मिळालेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. या विभागाने सन २०२४ मध्ये तंबाखूचे व्यसन करणाऱ्या तब्बल १५३९ महिलांचे समुपदेशन केले आहे. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकच व्यक्ती आपला ताण कमी करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टींच्या व्यसनात अडकला आहे. यामध्ये कुणी संगीत ऐकतो, तर कुणी एकांतवासात राहतो, कुणी सिगारेट ओढून तर कुणी मद्यप्राशन करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कित्येकांना तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तोंडात तंबाखू-गुटखा भरून ठेवण्याची सवय जडून जाते. सुरुवातीला फक्त काही काळ आनंद देणारी ही सवय पुढे जाऊन व्यसनात परावर्तित होते व त्यानंतर त्या व्यक्तीला याशिवाय राहताच येत नाही. तंबाखू-गुटखा आदींचे व्यसन यातच मोडते.

तंबाखू-गुटखा खाणे हे फक्त पुरुषांनाच शोभते असे वाटते. मात्र असे नसून पुरुषांच्या पाठोपाठ महिलाही तंबाखू-गुटखाचा बोकणा तोंडात भरून राहतात असे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातील सन २०२४ मधील अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत तब्बल १५३९ महिलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये त्यांना तंबाखू-गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

१४ वर्षापर्यंतची मुले-मुलीही शौकीन विभागाकडून तयार करण्यात आलेल्या गटांची पाहणी केली असता त्यात ० ते १४ वर्षापर्यंतच्या पुरुषांच्या गटात तब्बल ३२ मुले तंबाखू-गुटखा खाणारी आहेत. तर दोन मुलींचाही यामध्ये समावेश आहे. शिक्षण व खेळण्याच्या वयात त्यांना हे व्यसन जडणे म्हणजे ही बाब किती गंभीर आहे ही आकडेवारी दाखवून देत आहे.

३१३१ पुरुषांचेही केले समुपदेशनजिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाकडून ३१३१ पुरुषांचेही समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये ही गट पाडण्यात आले आहेत. तंबाखू-गुटख्याचे व्यसन करणाऱ्यांत पुरुषांची संख्या जास्त आहे, यात शंका नाही. मात्र महिलांचाही यात समावेश ही बाब मात्र चिंतनीय आहे.

प्रत्येकच गटात महिलांचा समावेश राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाने तंबाखू-गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करीत असलेल्यांना वयोगटनिहाय विभागले आहे. यामध्ये ० ते १४, १५ ते ४९ व ५० वर्षाच्या वर असे ते अट असून आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येकच गटात महिला- मुलींचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १५३९ महिलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. वास्तविक अशा शौकीन महिलांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असणार यात शंका नाही.

टॅग्स :gondiya-acगोंदियाTobacco Banतंबाखू बंदी