लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लघु पाटबंधारे विभाग व वन्यजीव विभागाचे संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी थाटेझरी तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला होता. यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र तलावाच्या गेटचे बांधकाम निकृष्ट दर्जाच्या करण्यात आल्याने तलावातील पाणी वाहून गेले. यामुळे पावसाळ्यात तलावालगत असलेल्या शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र संबंधित विभागाने यानंतरही या तलावाची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे हा तलाव सध्यास्थितीत पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलावाच्या गेटचे बांधकाम चांगले केले असते तर तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले असते. शिवाय वन्यप्राण्यांना सुध्दा पाण्याची सोय झाली असती मात्र लघु पाटबंधारे आणि वन्यजीव विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे तलावाचा कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. थाटेझरी तलावातील गाळाचा उपसा करुन गेटची दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
व्याघ्र प्रकल्पातील तलाव तहानलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:21 IST
नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्याघ्र प्रकल्पातील तलाव तहानलेलाच
ठळक मुद्देपाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती : नियोजनाचा अभाव